शहर पोलिसांनी कैलास दुर्गे यांच्या घरातील घरफोडीच्या आरोपीला ठोकल्या बेड्या



शहर पोलिसांनी कैलास दुर्गे यांच्या घरातील घरफोडीच्या आरोपीला ठोकल्या बेड्या

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक ०५/१२/२०२३ रोजी घटना ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी नामे कैलाश तुकाराम दुर्गे वय ३७ वर्ष, धंदा मजुरी, रा. आर.के. चौकजवळ, भिवापुर वार्ड, चंद्रपुर यातील फिर्यादीचे वडिल हे आपल्या मुलीला घेउन नागपुर येथे रुग्नालयात गेले असता व आई ही मुलीकडे राहण्यास गेली असता, कोणीतरी अज्ञान चोराने रात्रो दरम्यान घराच्या दरवाजाचा कोंडा तोडुन आत प्रवेश करून लोखंडी आलमारीचा लॉक व लॉकरचा लॉक तोडुन आलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागीने व नगदी रोख रक्कम असा एकुण २,४२,५८७ /- रू. चा माल चोरून नेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार साहेब, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत पो.स्टे. चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेउन पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथील डी.बी पथक मधील सपोनि मंगेश भोंगाळे, पो.उप.नि. शरिफ शेख तसेच डि.बी. कर्मचारी असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन गुप्त बातमीदाराच्या आधारे आरोपीस नागपूर आतून ताब्यात घेवुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप.क. ७७१/२०२३ कलम ४५७, ३८० भादंवि
आरोपीचे नाव :- अमोल उर्फ छोटा ईलम आदेश ईलमकर वय २३ वर्ष रा. वार्ड क्र. ६ समता नगर दुर्गापुर ता. जि. चंद्रपुर
जप्त माल :- सोन्याची जेन्ट्स अंगठी वजन ग्रॅम ५.२४० ग्रॅम कि. ३०,००० रू. सोन्याची लेडीज अंगठी ३.६० ग्रॅम किं. १८००० रू.एक सोन्याचे मंगळसुत्र ज्यात काळे मनी असलेले वजन १२.९०० ग्रॅम कि. ६५०००रू.
दोन जोड कानातील सोन्याचे टॉप्स वजन ६.८०० ग्रॅम किं. ५०,५०० रू.
एक सोन्याचे नेकलेस सेट ज्यात कानातील टॉप्स वजन १०.२५ ग्रॅम कि. ६५,५०० रू.
सोन्याचे कानातील रिंग वजन २.९०० ग्रॅम कि. १९,००० रू. तीन सोन्याचे अंगठी वजन ११.५४ ग्रॅम कि. ६८,०००रू. नगदी रक्कम १२७० रू.असा एकुण ३,११,७७० /- रू. चा माल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, सपोनि. रमीझ मुलानी, पोउपनि शरिफ शेख, पो. उपनि. संदिप बच्छीरे, पो.उप.नि. विलास गेडाम, स. फौ. विलास निकोडे, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो. हवा. निलेश मुडे, म.पो.हवा. भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्यातील पुढील तपास सपोनि. मंगेश भोंगाडे करीत आहे.