ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर गावात शोककळा उमरेड तालुक्यातील शिर्शी जवळ झालेल्या अपघातात गावातील 4 महिला ठार तर 13 जखमी





ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर गावात शोककळा

उमरेड तालुक्यातील शिर्शी जवळ झालेल्या अपघातात गावातील 4 महिला ठार तर 13 जखमी

दिनचर्या न्युज :-
ब्रम्हपुरी :- शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील मौजा माहेर येथून वर्धा जिल्ह्यात चना कापायला गेलेल्या 17 महिला काम आटोपून सुमो या वाहनाने परत येत असताना आज दिनाक 8 ला सायंकाळी 7.30 दरम्यान उमरेड तालुक्यातील सिर्सी जवळ वाहन पलटून झालेल्या अपघातात तीन महीलांचा घटना स्थळीच मृत्यू झाला तर एक नागपूर येथे नेत असताना वाटेत मारन पावली वाहनाच्या चालकासह 13 महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
ब्रम्हपुरी शहराजवळील माहेर येथील 17 महिला या मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चना कापणीच्या कामाला जात होत्या.एक सुमो रोज त्यांना चना कापणी करता घेऊन जात असे व सायंकाळी परत वापस माहेर येथे आणून देत असे. रात्रौ चालक वाहनं सोबत माहेर येथे मुक्कामी राहत होता.
मागील काही दिवसा प्रमाणे माहेर येथील 17 महिला आज दिनाक 8 ला पहाटे सुमो या वाहनात बसून पिंपरी या गावी चना कापणीला गेल्या होत्या.सायंकाळी 7.30 वाजता परत येत असताना उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ त्यांच्या वाहनं पलटून गंभीर अपघात झाला.वृत्त लिहे पर्यंत प्राप्त माहिती नुसार अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन , रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सोनाबाई सिद्दुके ही नागपूर येथे नेत असताना वाटेत मरन पावली जखमी तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने,
संगीता देविदास आडकिने ,विना विक्रांत अडकिने,संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे
,मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम ,जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिला सह सुमोचा वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम वय 30 राहणार जांभुळघाट हा गंभीर जखमी झाल्या असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजुरकर यांना होताच यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली.एका रुगणवाहिकेतून तीन महीलाचे शव उमरेड येथे पाठवण्यात आले.उर्वरित जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुरकर जखमी सोबत नागपूरला गेले असून सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत.घटनेची माहिती माहेर येथे होताच सर्व गावात शोककळा पसरली आहे.