20 वर्षापासून राजू कोंडस्कर करतोय दिव्यांगाच्या विवाह सोहळ्यात निशुल्क सेवा




20 वर्षापासून राजू कोंडस्कर करतोय दिव्यांगाच्या  विवाह सोहळ्यात निशुल्क सेवा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, चंद्रपुर द्वारा मागील २० वर्षापासून दिव्यांग बांधवाचे विवाह जोडून प्रतिष्ठापूर्ण विवाहीत जिवनाची सुरूवात करण्याकरीता दरवर्षी दिव्यांग जोडप्यांचा सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करित असते.
या कार्यक्रमासाठी राजू कोंडस्कर आणि त्याचे सहकारी दिव्यांग बांधवांची निशुल्क कटिंग दाढी करीत असतो.
मागील वीस वर्षापासून दरवर्षी कुठलीही अपेक्षा न करता या कार्यक्रमात आपले सहकारी घेऊन इथे दडी कटिंग करून सेवा देतो. यावर्षी खास करून माजी खासदार नरेश बाबू पुगलीया यांनी राजू कोंडस्कर यांचा सामाजिक क्षेत्रातील विशेषणीय सेवा पुरस्कार त्यांनी आपल्या हातून देऊन पुरस्कृत केले. या कार्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी सुद्धा राजू कोंडस्कर यांचे आभार मानून अभिनंदन केले. असे समाज उपयोगी कार्य आपल्या समाज बांधवाकडून होत राहावी. हा हर्ष दिव्यांग बांधवासमवेत वाटेकरी बनून नृत्य तथा संगित अविष्कारासह हर्षो उल्हासीत होऊया. या सहकुटूंब मित्रा समवेत प्रेम व स्नेहाचा वर्षाव करावा हीच सार्थ अपेक्षा
असे मनोगत पुगलीया यांनी व्यक्त केले.