आगामी विधानसभा निवडणुकीचा लढा? अपक्ष आमदाराचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र ! chandrapur






आगामी विधानसभा निवडणुकीचा लढा? अपक्ष आमदाराचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
कोल्हापूर येथे दोन दिवसीय शिवसेनेच्या राज्य अधिवेशनात चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी हजेरी लावली. आगामी विधानसभा निवडणूक च्या चिन्हावर लढवणार अशी घोषणा करणारे जोरगेवार यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कानात कान घुसनी केली. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिंदे गटाकडून लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
 किशोर जोरगवार यांनी 2019 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून देशात सर्वप्रथम मतदान घेऊन विजयश्री संपादित केला.
 2009 पासून त्यांनी मुनगंटीवार यांच्या मदतीने भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते.
 मात्र भाऊ ,भैया यांच्या वादात पूर्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जाऊन  उमेदवारी  मिळावी यासाठी  दावेदारी केली होती. परंतु भाजपाने नागपुरातील   नाना शामकुडे यांना चंद्रपुरात पार्सल म्हणून पाठवलं आणि त्यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत यश संपादन केलं. ते चंद्रपूरचे बाहेरून आलेले पहिले आमदार ठरले. किशोर जोरगेवार यांच्या  पदरी निराशा पडली होती. 2014 मध्ये यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्यात 50000 पेक्षा अधिक मते मिळाली पुन्हा निराशा पदरी आली.
2019 च्या  विधानसभा निवडणुकीत जोरगेवार ७५ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेवून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले.
 चंद्रपूर करांच्या आशा पल्लवीत करणारे  वचन नामे जोरगेवार यांनी जनतेसमोर ठेवले. त्याची पूर्तता आपण केली नाही तर, तुम्हाला तुमचे ' अंतर्मन'  अंतरात्म्याचा आवाज झोपू देणार नाही. कारण मन कधी खोटे बोलत नाही. सद्या देशांमध्ये 'खोटे बोला पण रेटून बोला' असा सिलसिला सुरू आहे. कारण आपण दिलेले वचन नामे जनतेच्या कळमणी उतरले आहे. त्यामुळे येणाऱ्या  2024 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निवडून येणे कठीण असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे जोरगेवार यांनी राजकीय पक्षाचा आधार शोधणे सुरू केले आहे. 
अशातच राज्यात खडतड प्रवासात मुख्यमंत्री शिंदे  यांना पाठिंबा दिला आहे. जिकडे सत्ता तिकडे अपक्षाचे लोळणे जनतेच्या लक्षात आले आहे. यामुळे शिवसेनेच्या राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानाला लागून चर्चा करणे म्हणजेच पक्ष  निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
 जोरगेवार यांनी 2024 ची  विधानसभा निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावरच लढणार अशी भूमिका राजकीय वर्तुळात मांडली होती. मात्र  कोणासोबत जाणार हे सांगितले नव्हते.
  जोरगेवार भाजपकडून निवडणूक लढणार की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, की शिवसेना शिंदे गट, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
 मात्र, जोरगेवार यांनी कोल्हापूर येथे शिवसेनेच्या राज्य अधिवेशनाला पूर्णवेळ हजेरी लावली. त्यामुळे आता जोरगेवार शिंदे गटाकडून चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक  लढवतील?  असे  बोलले जात आहे. जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री  सुधीर  मुनगंटीवार यांचा  वसा घेऊन राजकारणात प्रवेश केला होता. आता सरकार संयुक्त असून त्या अपक्ष आमदाराची सरकारमध्ये समर्पण आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काय भविष्य राहील,
 याचे भाकीत चंद्रपूरकरांना लागले आहेत.

दिनचर्या न्युज 

पुढील अंकात... राज्यस्तरीय कुस्तीच्या मैदानात कार्य कत्यांचा राडा...!