'जाणता राजा' महानाट्यात प्रशासनाकडून नागरिकांची गैरसुविधा !




'जाणता राजा' महानाट्याात प्रशासनाकडून नागरिकांची गैरसुविधा !

सांस्कृतिक कार्यक्रमात काय घडले? सविस्तर वाचा!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यात 2 फेब्रुवारीपासून चार तारखेपर्यंत व पाच तारखेपर्यंत वाढीव प्रयोगाचे 'जाणता राजा' महानाट्य प्रयोगाचे शासकीय प्रशासनाकडून चंद्रपूर येथे आयोजन करण्यात आले . हा सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय की राजकीय असा संभ्रम जनतेत चर्चेला जात आहे. या महानाट्यासाठी राजकीय पार्टीचे वरदस्त असताना दिसून आले.
शासनाकडून 'जाणता राजा' महानाट्य प्रयोगाचे चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे आयोजन शासनातर्फे करण्यात आले असले तरी 'जाणता राजा' या नाटकाचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना विशिष्ट पासेस नागरिकांना अद्यावत करण्यात आले होते. खास करून चंद्रपूर जिल्हा अधिकारी यांनी पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी विशिष्ट बॅनर लावून व्यवस्था करण्याचे आयोजकांना सुचित करण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी एकाही पत्रकारांना बसण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. अनेक पत्रकारांनी आपलं आसन नसल्याने महानाट्य प्रयोगाचे आयोजन नाकारले. त्या ठिकाणी व्हीआयपी नंबर नसल्याने ,अनेक व्हीआयपी पास वाटल्या गेल्याने पत्रकारांची गोची झाली .
 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित व्हावा या दृष्टिकोनातून  अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी प्राचारण करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाकडून  शिक्षण विभागाकडे  त्यांची  सुव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली होती. 
परंतु या विभागाची  दो तोंडी  भूमिका बघाव्यास मिळाली.
रोज   विविध शाळेतील अडीच हजार विद्यार्थ्यांना  या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा यासाठी विशिष्ट व्यवस्था शाळेकडून करण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाच्या शिक्षण विभागाकडून काही निवडक विद्यार्थ्यांना नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली. संबंधित नास्ता व पाण्याची व्यवस्था ही जनरल लोकांसाठी करण्यात आली का? व त्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी या नास्ताची व्यवस्था कुणासाठी केली? याची जिल्हा परिषदेच्या कार्यपालन अधिकारी यांनी चौकशी करण्याची गरज आहे.
संबंधित   जिल्हा परिषदेच्या  अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भाची गैरसोय केल्याचे निदर्शनास आले आहे.
 कर्मचाऱ्याकडून दो तोंडी भूमिका बजावली गेली.
हा सांस्कृतिक कार्यक्रम शासकीय की राजकीय असा संभ्रम जनतेत चर्चेला जात आहे. या महानाट्यासाठी राजकीय पार्टीचे वरदस्त असताना दिसून आले.
  हा कार्यक्रम कुणाचा? असा प्रश्न मात्र आता नागरिक करू लागले होते.

 पहिल्याच दिवशी राजकीय पक्षाच्या स्वागत गेट साठी बॅनर बाजी वरून  चांगली जुंपली. या कार्यक्रमासाठी सुरुवातीला  दोन राजकीय  नेत्याच्या कार्यकर्त्यात  राळा झाल्याने चांगले चर्चेत आले .जाणता राजा या कार्यक्रमासाठी  स्थानिक आमदाराकडून स्वागत गेट लावण्यात आले होते. मात्र यात पालकमंत्र्याच्या  कार्यकर्त्यांनी स्वागत गेट लावण्यासाठी राळा केल्याने चंद्रपूर शहरात चांगलीच चर्चा होत आहे.
  शहरातील अस्तित्वाची लढाई  यापूर्वी अनेकदा विविध कार्यक्रमात झाल्याचे  जनतेच्या निदर्शनास आले आहे. मात्र आता सांस्कृतिक विभागाच्या शासनाकडून होत असलेल्या 'जाणता राजा 'या महानाटकांचे आयोजन चंद्रपूर शहरात केल्या जात असताना दोन राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यात   चांगलीच उद्धचबाजी झाल्याने  प्रसार माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
 एवढेच नाही तर या कार्यक्रमासंदर्भात शासकीय   प्रशासनाकडून नागरिकाची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे.  अनेकांना पास न मिळाल्या त्यांना कार्यकर्त्याकडून नमो नमो ॲप  दाखवून एन्ट्री गेटवरून प्रवेश भेटत होता अशी चर्चा होत आहे!
  अनेक बहाद्दर लोकांनी या  व्हीआयपी पासेसच्या कलर झेरॉक्स मारल्या गेल्याची बाब समोर येत आहे.
एवढेच नाही तर या कार्यक्रमात अनेक नागरिकाकडून   पासेस विकल्याच्याही चर्चा होत आहे? संबंधित कार्यक्रमासाठी विष्टी गेट द्वारे  विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी आसन स्थान केल्या गेले आहे. परंतु प्रशासनाकडून कुठलेही या संदर्भाची दखल घेतल्या गेली नाहीये. अनेक व्हीआयपी नागरिकांना, व जाणता राजा महानाट्य पाहण्यास येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. व्हीआयपी बसण्याच्या खुर्च्यापेक्षा लोकांची व्हीआयपी कक्षात गर्दी जास्त होती.
प्रशासनाकडून  हलगर्जीपणा होत असल्याचे लक्षात  आले. दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही बसण्यास  आसन  खाली    नव्हते .  नागरिकांनी या राखीव बसण्याच्या जागेतही गर्दी केली होती.   त्यामुळे त्यांनी चांगले  खडे बोल सुनवल्या गेले.
दोन,तीन, चार तारखेला झालेल्या 'जाणता राजा' या  महानाट्यप्रयोगात  अनेक नागरिकांना पास असताना सुद्धा आसंस्थापन होता आला नाही. त्यामुळे अनेक व्हीआयपी लोकांना पासेस मिळाल्या असून सुद्धा स्थानापन्न होत आले नाही. नागरिकांत नाराजीचा सूर उद्भवत आहे.
उद्या सोमवारला जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी  'जाणता राजा' या नाटकाचे प्रयोग सर्वांसाठी खुले असल्याचे आव्हान केले आहे. जो जा खुर्चीवर बसेल तो आरक्षित असेल ,असे असले तरी सूत्राच्या माहितीनुसार व्हीआयपी, व्ही व्ही आय पी ,अशा लोकांना पाशेश दिल्या गेल्याची चर्चा होत आहे. मग जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे एक  वाक्य आहे. दिला शब्द पूर्ण केला  पूर्ण! मग या महानाट्यात होणाऱ्या खुला प्रयोजक महानाट्याचे काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकात होत आहे.
या नाटकाचे  सादरीकरण  हे साडेतीनशे वर्षापूर्वी  महानायक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक कथेवर आधारित  असलेल्या 'जाणता राजा' यांची माहिती सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी ही सांस्कृतिक विभागाची  मनीषा होती.
   मात्र चंद्रपूर झालेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रशासनाने हलगर्जी  पणामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला.  राज्य शासनाकडून  या महानाट्यप्रयोगासाठी करोडो रुपयाचा खर्च केला गेला. परंतु सर्वसामान्य नागरिकांना याचा आस्वाद घेता आला नाही. तर मग तो करोडो रुपयाचा खर्च कशासाठी अशी चर्चाही आता सर्वसामान्य नागरिकात होत आहे.