निष्ठूर सरकार उघड्या डोळ्यांनी पाहतो शेतकऱ्यांचे मरण !





निष्ठूर सरकार उघड्या डोळ्यांनी पाहतो शेतकऱ्यांचे मरण !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- (वर्धा)
सध्या शेतकरी सर्वीकडून अस्मानी -सुलतानी संकटणी हवालदील झाला आहे. राज्यात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना प्रलोभन देऊन शेतकऱ्यांची खातेदारी झाल्याचे वाहवा करून घेतो. शेतकऱ्याची अशी गत झाली आहे 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी अवस्था राज्य सरकारने शेतकऱ्यांची करून घेतली आहे. सध्या राज्यात कापसाला क्विंटल मागे 900 रुपयाचा तोटा, हमीभाव मिळणार तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. खुल्या बाजारात कापसाला मात्र 6300 चा दर मिळत आहे. हमीभावापेक्षा तब्बल 900 रुपये आणि कमी झाला. शेतकरी कापूस उत्पादन केंद्रावर गेले असता त्यांना अटी शर्ती ची यादी दाखवल्या जाते. मग या शेतकऱ्याने कापूस विकायचा कुठे?
या व्यवस्थेला कंटाळून वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गाडी भरून नेलेल्या कापूसच पेटवून दिला. संपूर्ण महाराष्ट्रात मन हादरून सोडणारी घटना सरकार आपल्या उघड्या डोळ्यांनी निष्ठुरपणे शेतकऱ्याचे मरण पाहत आहे.
वर्धा जिल्ह्यातील रोटा येथील शेतकरी अमोल ठाकरे यांचे जिवंत उदाहरण बघा. आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन कापूस केंद्रावर खुल्या बाजारात कापूस विकायला आणला असता त्याला. तुझी सातबारावर पेरणीची नोंद नसल्याने त्याचा कापूस विकत घेण्यास नकार दिला. आपल्या लहान मुलाला घेऊन दिवसभर आपल्या कापसाच्या विक्रीसाठी अमोल डोळ्यातील अश्रू चे पाणी गळत होता. ह्या असहाय्य होणाऱ्या आपल्या बापाच्या वेदना पाहून त्या मुलाला काय वाटत असेल? गहिवरून रडत असलेल्या बापाच्या आणि मुलाच्या डोळ्यात संवेदनशील च्या बाहेरचे अश्रू वाहत होते.
पण त्या निष्ठूर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना त्याचा थोडा शा गहिवराही आली नाही. विक्रीला आणलेल्या कापूसाचा खर्चही निघेना, या विवेचनाला कंटाळून त्या शेतकऱ्याचा संतापअणावर झाला.शेतात राब राब राबून रक्ताचे पाणी करूनही कापसाला भाव मिळत नाही म्हणून पोटच्या लेकराप्रमाणे संगोपन करून वाढवणारा त्या पिकवलेल्या कापसाला क्षणाचा विलंब न करता आपल्या लेकरा समोर गाडीच पेटवून दिले.
या पेटवलेल्या गाडीचा व्हिडिओ किती वेदनादायी आहे. आवरून असे दिसून येते की या निष्ठूर सरकारला शेतकऱ्याची काही देणे घेणे नाही. या सरकारच्या संपूर्ण संवेदना मेल्या आहेत. असा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
विदर्भ हा पांढरे सोने पिकवणारा प्रदेश म्हणून विदर्भाची ओळख आहे. मागील दोन वर्षांपूर्वी कापसाला 14000 प्रति क्विंटलचा दर मिळाला. या आसेने विदर्भातील शेतकऱ्यांनी कापसाची अधिक लागवड केली. मात्र मागील वर्षीपासून या निष्ठूर सरकारने कापसाचा दर कोसळल्यामुळे अनेकांनी कापूस आपल्या घरात साठवून ठेवला. हंगाम संपत आला दर वाढेल या आसेने शेतकऱ्याने आपला कापूस घरात साठवून ठेवला. हंगाम संपण्याची वेळ आली परंतु कापसाचा दर काही वाढेना. 14000 तर दूरच साधा हमीभाव सुद्धा त्या कापसाला मिळेना झाला आहे. सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पणन महासंघाची केंद्र तातडीने सुरू करावे. 7200 प्रतीक क्विंटलच्या हमीभावाने कापूस खरेदी करावा. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश तातडीने देण्यात यावे. सी सी आय च्या जाटकटी रद्द कराव्या. अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडतीवार यांनी सरकारला खडसावले आहे.