वंचित मुळे विरोधी उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकली - राजेश बेले




वंचित मुळे विरोधी उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकली - राजेश बेले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- चंद्रपूर आणीँ -वणी लोकसभा क्षेत्रातील रणसंग्राम सुरू झाला आहे. भाजपा, काँग्रेस आणि तिसऱ्या लोकसभेत उमेदवार असलेल्या वंचितच्या राजेश बेले यांच्या उमेदवारीने प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकली आहे , सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप पत्यारोप करणे विरोधकांचे सुरू झाले आहे.
स्थानिक लोकनेत्यांचे, पुराव्यासह सगळे घोटाळे बाहेर काढणार आहे , मोठमोठ्या इव्हेंट झाल्या , जनतेच्या पैशांची उधळपटी केली जात आहे , मी गुन्हेगार असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा , बेरोजगारी , गुन्हेगारी ची सगळी आकडेवारी घेऊन मी उतरणार आहे , वंचित बहुजन आघाडी चा आवाज संसदेत गाजवणार आहे . माझ्या उमेदवारीमुळे मी कुणाचाच प्रतिस्पर्धी नसून माझे ते प्रतिस्पर्धी आहेत. वंचित ही कुणाची बी टीम नसून बाकीचे पक्ष हे वंचितची बी टीम आहेत. असे आज झालेल्या पत्रकार परिषदेतून वंचित चे लोकसभा उमेदवार राजेश बेले यांनी सांगितले. जिल्ह्यातील संपूर्ण तेली समाजाचा पाठिंबा असल्याचाही त्यांनी सांगितले.
प्रांतिक अध्यक्षांनी जाहीर समर्थन लवकरच जाहीर करण्याचे सांगितले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक मुद्द्यांना घेऊन मी लोकसभा चित्रात करणार आहे. जिल्ह्यातील होत असलेल्या प्रदूषणावर, स्थानिक बेरोजगार संदर्भात. शेतकरी, उद्योग, वाढती महंगाई, शैक्षणिक धोरण हे स्थानिक मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. मला भरभरून जनता प्रतिसाद देईल यात तिळमात्र शंका नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत हा वंचितचाच  भरगोस मतांनी विजय राहील