पोलीस अधीक्षकांची जोरदार बॅटिंग तरी सट्टा बाजारवाल्यांची गोलंदाजी सुरूच !
पोलीस अधीक्षकांची जोरदार बॅटिंग तरी सट्टा बाजारवाल्यांची गोलंदाजी सुरूच !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक रुजू झाले. तेव्हापासून जिल्ह्यातील अनेक अवैध्य धंद्यावर कारवाई करण्याचे धाडसत्र पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. पोलीस अधीक्षकांची जोरदार बॅटिंग तरी सट्टा बाजारवाल्यांची गोलंदाजी सुरूच असल्याचे विदारक चित्र शहरात सुरू असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात सुरू आहे !
जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात सट्टा बाजार सर्रास सुरू आहे. सामान्य माणसाचे कुटुंब सट्टा बाजारामुळे उध्वस्त झाले आहेत. सट्टा किंग मात्र कुणाच्यातरी आशीर्वादाने रोज गरीबाच्या पैशावर लाखोंची माया जमविण्यात मस्तावले आहेत.
चंद्रपुर शहरातील सट्टा बाजार कायमचा बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक ह्यांना निवेदन
चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी जसे जटपुरा गेट परिसर, दुर्गापूर, बंगाली कॅम्प, बस स्टँड परिसर, भिवापूर , पठाणपुरा तसेच शहरात, तालुक्यात अन्य ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सट्टा बाजार सुरू आहे .या सट्टा बाजार मुळे गोरगरीब जनतेचे परिवार उध्वस्त होत आहे. आणि ह्या सट्टा  बाजारास आळा घालण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बब्बू भाई इस्सा यांच्या नेतृत्वात चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले व चंद्रपूर शहरातील अवैध चालणाऱ्या सट्टा बाजार विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि पोलीस अधीक्षक ह्यांनी हा चालणाऱ्या सट्टा बाजार  त्वरित बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले .निवेदन देते वेळी विधानसभा उपाध्यक्ष सुरज चव्हाण, अल्पसंख्यांक नेते जमील शेख, जलील भाई, बंडू चवरे,अश्विन  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र  पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.