जिल्हा प्रशासकीय भावनात पाण्याचा तुटवडा वाशरूमलाही पाणी उपलब्ध नाही!
जिल्हा प्रशासकीय भावनात पाण्याचा तुटवडा
वाशरूमलाही पाणी उपलब्ध नाही!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात तापमानाचे प्रमाण सध्या वाढत असून
उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. शासकीय कार्यालयात असलेल्या बोरिंगचे पाणी सुद्धा आटले आहे. जिल्हा प्रशासकीय भवनात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये मागील काही दिवसापासून पाण्याचा तुटवडा जानवत आहे. साधे शौचालयालाही जातो म्हटले तर कार्यालयात अधिकाऱ्यांना ,कर्मचाऱ्यांना, नागरिकांना पाणी मिळत नाही. उष्णतेचा पारा वाढत असल्याने प्रत्येक कार्यालयात कुलर लावण्यात आले आहेत. परंतु त्या कुलर मध्ये पाणी टाकण्यास प्रशासकीय भावनाच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणीच नसल्याने गर्मीचा मार सहन करावा लागत आहे.
नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावा लागत आहे.
महानगर पालिका चंद्रपूर द्वारा पाण्याच्या टाकीत मध्ये पुरवठा करण्यात येते. मागील काही दिवसापासून या टाकीमध्ये मनपा प्रशासनाकडून पाण्याचा पुरवठा होत नसल्याची बोंब प्रशासकीय कार्यालयात होत आहे. माननीय महोदय जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्हा प्रशासकीय भवनात पाण्याची होत असलेली टंचाईकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला पाणीपुरवठा करून देण्यात यावी अशी मागणी आता प्रशासकीय भावनातील सर्व शासकीय विभागाकडून होत आहे.