महेशला येणाऱ्या विधानसभेचे लागलेले 'डोहाळे' पूर्णत्वास जातील का ?



महेशला येणाऱ्या विधानसभेचे लागलेले 'डोहाळे' पूर्णत्वास जातील का ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचतात. मागील विधानसभा निवडणुकीत जमानत जप्त,दारुण पराभव पत्करणाऱ्या मैशला पुन्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे डोहाळे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा कौल पाहता
पुन्हा बिळातून नागाने फणा काढला आहे. त्या दृष्टिकोनातून दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हा वासियांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मेजवानीचा सूर मधुर गीताचा कार्यक्रमाची मेजवानी देऊन मोठमोठे सेलिब्रेटी आणून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न तर करत नसावा? असा कयास चंद्रपूरकर करीत आहेत. त्याचा काही फायदा होणार नाही असे जानकारांचे मत आहे. चंद्रपुरातील जनतेला चांगलेच माहित आहे की, कुठले पार्सल कुठे पाठवायचे! त्यामुळे बाहेरचे पार्सल चंद्रपूरकरांनी नाकारले! आणि त्याची प्रचिती ही मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आले. त्यात याची जमानते जप्त झाली होती. परंतु 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल पाहून बिळातून महैश बाहेर आला. यालाच म्हणतात 'आयत्या बिडाचा नागोबा'!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनी आयोजित केलेल्या सूर मधुर गीतांचा कार्यक्रम चंद्रपूरकरांसाठी मेजवानी आहे की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 'तो मी पुन्हा आहेच'! असे सांगण्यासाठी  कार्यक्रमाचे लालीपाप देऊन जनतेला आपलेसे करण्यासाठी होय का?
कारण मागील चार वर्षापासून राजकीय, समाजकार्याच्या सेवेपासून दूर राहिलेले, आता अचानक  चंद्रपूर शहरात सगळीकडे होडींगबाजी करून  उदो उदो करून घेण्यात धन्यता मानणाऱ्या या महेशला लागलेला  विधानसभेच्या डोहाळ्याचे  वेद पूर्णत्वास जातील का ?