राजीव गांधी अभियांत्रीकी, महाविद्यालयात भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यस्मरण श्रध्दाजली कार्यक्रम
राजीव गांधी अभियांत्रीकी, महाविद्यालयात
भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यस्मरण श्रध्दाजली कार्यक्रम

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

भारतरत्न राजीव गांधी माजी पंतप्रधान यांची आज दि.21/5/2024 ला राजीव गांधी अभियांत्रीकी, महाविद्यालय,संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालयात द्रष्ट्याचे पुण्यस्मरण श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. शफिक अहमद, हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिक्षक विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले,
प्रमुख वक्ते मा. श्री. नितीन रोघे, डायरेक्टर, पी.जी.आय. कॉपरिशन, नागपुर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, एस.पी.एम.एस., सचिव विनोद दत्तात्रेय यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ते म्हणाले की, भारतरत्न राजीव गांधी, माजी पंतप्रधान यांचे देशासाठी टेक्नॉलॉजी क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे.
या थोर पुरुषाचे या कॉलेजला नाव देण्यात आले. थोर पुरुषाचे अनुकरण करताना देशासाठी फार मोठे योगदान आहे. देशाला नवीन लकाकी देण्याची कामही या थोर पुरुषाने केले. पुनच्छ या महाविद्यालयाला नवीन स्वरूप प्राप्त करून घेऊ अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. म्हणून हा द्रष्ट्याचे पुण्यस्मरण श्रद्धांजली कार्यक्रम हा दिवस वेगळ्या पद्धतीने करूया असे मनोगत संस्थेचे सचिव विनोद दत्तात्रेय त्यांनी व्यक्त केले.
शिक्षक आमदार
सुधाकर अडबाले म्हणाले आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे मी आज विधान परिषदेचा आमदार झाल्याचे सर्वांचे आभार मानले. या थोर पुरुषाने अनेक टेक्नॉलॉजी क्षेत्राची जाडे मुळे रोवली.
डॉक्टर नितीन रोघे म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी, यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाचे सावे पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळली . आणि देशात सर्वात मोठी टेक्नॉलॉजी स्वर्गीय राजीव गांधी यांनी आणली. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा नवीन विस्तार केला. लोकसभेत सर्वात जास्त 403 सीटा स्वर्गीय राजीव गांधी यांच्या काळात मिळाल्या. जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी आणि सर्वात  मोठी   व्यवस्था रेल्वे सुरू झाली.
 कॉम्प्युटर, मोबाईल, अशा विविध टेक्नॉलॉजी या महापुरुषाच्या  असताना  उदयास आल्या.
 नवोदय विद्यालय सारख्या केंद्रीय शाळेचा उदय  जिल्ह्यात ही स्व.राजीव गांधी यांनीच केला. ही सर्व स्व. राजीव गांधी  यांचीच देण आहे. असे मत प्रा. रोघे यांनी व्यक्त केले.
मंचावर प्रमुख उपस्थिती माजी प्रा. किर्तीवरधन दिक्षीत, 
-सुरेश पोटदुखे ,अरविंद सावकार पोरेड्‌डीवार ,  जयत वेलंकीवार , प्रशात पोटदुखे,. निनाद गड्डमवार सन्माननीय विश्वस्त, सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट),  डॉ. अनिल चिताडे प्राचार्य, राजीव गाधी अभियात्रीकी, सशोधान व तंत्रज्ञान महाविद्यालय, चंद्रपूरयांची प्रामुख्याने उपस्थित होते.