निकृष्ट दर्जाचे! नूतनीकरण झालेल्या जलतरण तलावाचे निघाले वाभाडे !
निकृष्ट दर्जाचे! नूतनीकरण झालेल्या जलतरण तलावाचे निघाले वाभाडे !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात एकमेव असलेले जिल्हा क्रीडा संकुलन यात असलेल्या जलतरण तलावासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक कोटी 57 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या निधीतून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या नेतृत्वात जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्याचे काही दिवसापूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आल्याची बातम्या माध्यमांना प्रकाशित आल्या होत्या. मात्र काही दिवसातच या जलतरण तलावाची पुन्हा डागडुगी करण्याची वेळ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांवर आली. त्यामुळे सुरू झालेले जलतरण तलाव बंद करण्यात आले.
तत्पूर्वी या जलतरण तलावाचे नूतनीकरण ज्या कंत्राटदारला दिले त्या कंत्राटदाराकडून जे साहित्य वापरल्या जात आहे ते निष्कृष्ट दर्जाचे असल्याची बातमी दिनचर्या न्यूज ने प्रकाशित केली होती. त्यात काही प्रमाणात जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्हा संकुलनात होत असलेल्या दुर्लक्षेकडे गांभीर्याने घेतले असते तर, निष्कृष्ट दर्जाचे सामान बदलण्याची वेळ आली नसती.
संकुलनात होत असलेल्या शौचालयात दुर्गंधी, संकुलनाथ पाण्याची व्यवस्था, आणि सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य अशा खेळण्यास संकुलन व्यवस्थित नाही. बॅडमिंटन हॉल पासून शौचालय गृहापर्यंत तर जलतरण तलावापर्यंत परिसरात पूर्णत: अस्वच्छता कचऱ्याचे ढिगाळे अस्ताव्यस्त असून जिल्हा संकुलनाची मुख्य वॉल कंपाऊंड शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे इथे पावसाळ्यात सरपटणाऱ्या प्राण्यापासून भीती होण्याची दाट शक्यता आहे.
करोडो रुपयाचे बांधकाम होत असलेल्या जलतरण तलावात निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम व साहित्य वापरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधित प्रशासनाने या झालेल्या बांधकामा संदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून करण्यात आली होती.
नूतनीकरणानंतर एका आठवड्यातच सुरू झालेला तलाव तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नसल्याने पोहण्यासाठी येणाऱ्या अपघाताला सामोर जावे लागताना दिसून आले.
एक कोटी 57 लाख रुपयांच्या निधी मंजूर झालेल्या जलतरण तलावाची विविध कामे करण्यात आली या कामासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी निविदायी काढली होती. त्यात नागपूरच्या कंत्राटदाराला काम देऊन जवळपास दीड वर्ष नूतनीकरणाच्या कामाला लावले. ते काम सदोष व निष्कृष्ट दर्जाचे असल्याची बाब आता समोर आली आहे. खाली लावण्यात आलेल्या स्टाईलवरून सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुखापत होत आहे. अशात एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने जलतरणासाठी मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे अनेक पालकांनी आपल्या लहान मुलांना पुणे शिकवण्यासाठी जलतरण तलावात मोठी गर्दी केली आहे. त्यासाठी प्रवेश सुद्धा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. परंतु एका हप्त्यातच जल तरण तलाव बंद झाल्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही दिवसांसाठी हिरमुळ व्हावं लागलं. आता पूर्ववत करण्यासाठी पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. ते केव्हा होईल हे नेमके सांगता येत नसून चाचपन्नी न करता घाई गडबडीत सुरू झालेले जलतरण तलावाचे वाभाळे निघाले असून , पुन्हा बंद झाल्याने सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?