स्वागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लखविंदरसिंह मल्ली यांची निवड
स्वागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लखविंदरसिंह मल्ली यांची निवड


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक 11/ 5 /2024 ला घेण्यात आलेल्या स्वागत नागरिक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे लखविंदर सिंह मल्ली यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सविस्तर वृत्त याप्रमाणे की,
चंद्रपूर येथील भानापेठ ,अंचलेश्वर वार्डात अजय बंडीवार यांच्या घरी स्वागत नागरिक पतसंस्था मर्यादित नावाची बँक अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी येथील एका संचालकाचा मृत्यू झाल्याने, नवीन संचालकासाठी पद भरती घेण्यात आली नव्हती. त्यानंतर बँकेवर प्रशासक बसवण्यात आले. तीन वर्षापर्यंत बँकेवर प्रशासक राज राहिले. त्यानंतर निवडणूक झाली. परंतु प्राधिकृत अधिकारी यांच्या निर्णयामुळे संस्थेत कुठलाही अध्यक्ष बसवल्या गेल्या नव्हता. अखेर परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी नागपूर हायकोर्टात दाद मागण्याचे ठरविले. बॉम्बे नागपूर खंडपीठ येथे संजय सिंग बैस यांच्या नावाने याचिका दायर करण्यात आली. या निर्णयानुसार दीड महिन्यात पदाधिकारी भरण्याची प्राधिकृत अधिकाऱ्यांना नोटी जाहीर केली. त्या अनुषंगाने 11 /5 /2024 ला निवडणूक घेण्यात आली. परिवर्तन पॅनलच्या अध्यक्षपदासाठी लखविंदर सिंह मल्ली यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अरुण जोगी यांची निवड करण्यात आली. तर मानद सचिव म्हणून शामराव बोढे यांची निवड करण्यात आली संचालक मंडळात संजय सिंग बैस, रमेश काकडे सौ. रूपाली आंबटकर यांचे निवडीसाठी योगदान राहिले. तर स्वागत सहकार पॅनल गटाकडून शालिक फाले यांनी अध्यक्ष पदासाठी फार्म भरला होता. परंतु त्यांना  तिघांनाही  पराभव पत्करावा लागला.
अध्यक्षासह सर्व निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदाकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे. पुढील भविष्यासाठी आणि बँकेला पुन्हा पूर्णत्वास आणण्यासाठी नवीन कार्यकारणी  योग्य दिशेने काम करावे असा सर्वांनी  शुभेच्छा दिल्या.