चंद्रपूर पंचायत समिती 'माझी वसुंधरा' कवी संमेलन संपन्न !chandrapur Panchayt Samiti

चंद्रपूर पंचायत समिती 'माझी वसुंधरा' कवी संमेलन संपन्न !

'माझी वसुंधरा' हा कार्यक्रम गावा गावात राबवावा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर पंचायत समिती तथा फिनिक्स साहित्य मंच आयोजित द्वारा 'माझी वसुंधरा' कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात विविध क्षेत्रातील कवीवर्यांनी सहभाग घेतला होता.
' माझी वसुंधरा'जीवनसृष्टीवर अनेकांनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध  केले. या कार्यक्रमाची संकल्पना चंद्रपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक धनंजय साळवे यांची असून या कवी संमेलनात जवळपास 30 कविव-यांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी तथा साहित्यिक मनोज बोकडे,
उद्घाटक श्रीमती मीना साळुंखे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद चंद्रपूर, 
 सुप्रसिद्ध कवी शुद्ध कविता लेखक नरेश कुमार बोरीकर, परमानंद मडावी कवी तथा लेखक, कवी तथा लेखक गोपाल शिरपूरकर यांची मंचावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
'माझी वसुंधरा 'अभियान हा उपक्रम गावागावात यशस्वीपणे राबवल्या जावा जेणेकरून वातावरणीय बदल घडवून आणता येईल तसेच घरोघरी शोषखड्डे व्हावे हा संकल्प सुद्धा या प्रसंगी करण्यातआला आहे.प्रत्येकाने वृक्षाची जोपासना आणि संगोपन करून हरित शपथ घेण्याबाबत नागरिकांना या कवी संमेलनातून विनंती केली आहे.
या कार्यक्रमासाठी चंद्रपूर बल्लारपूर पंचायत समितीचे ग्रामसेवक, तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.