अन् 'त्या' गावात आरोग्य विभाग धडकले, सचिवाला दिल्या तात्काळ उपायोजना करून अहवाल सादर करण्याच्या सूचना!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर (चिमूर) :-
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत
येरखेडा येथे नाल्यांचे दूषित पाणी रस्त्यावर, घाणीचे साम्राज्य, रोगराची समस्या ! निर्माण होऊन गावात महामारी ,रोगराईची समस्या निर्माण होण्याची भीती गावातील सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे .
. गावातील नाल्या पावसापूर्वी साफसफाई न केल्याने पावसाचे पाण्यासह गावातील नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे सर्वीकडे घाण पसरली असून रस्त्यावर चिखल सुद्धा झाले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
नाल्यातील घाण पाणी विहिरीत जात असल्याने आणि तेथील पाण्याचे उपयोग गावकरी बाहेरील वापरास करीत असल्याने विविध आजारांची समस्या निर्माण होऊ शकते. अशी तक्रार गावातील नागरिक अतूल चिंचुलकर यांनी गट विकास अधिकारी चिमूर पंचायत समिती यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन, आणि संबंधित वृत्तपत्राच्या बातमीच्या विमर्स घेऊन गट विकास अधिकारी फुलझले यांनी तात्काळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गावात पाठवून सचिवास सोबत गावातील नागरिकांना घेऊन पाहणी केली असता विहिरीचे पाणी पूर्वीपासूनच वापरण्यास अयोग्य आहेत. गावात आरोग्याच्या समस्या नाहीत .परंतु गावात आजूबाजूला पाणी व घानसाचल्याची दृश्य दिसून आलेत. त्यामुळे कीटकजन्य ,जलजन्य अतिसाराचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून गावातील नागरिकांनी क्लोरीन केलेले उखडलेले पाणी पिण्यास वापरावे. तसेच नाली स्वच्छ करून पाणी वहाते करण्यात यावे. उपसण्यात आलेला मलमा, घाण गावाबाहेर नेऊन टाकण्याच्या सूचना दिल्या. चिखलमय झालेल्या जागेवर मुरूम टाकण्यात यावे.गावात दिवाबत्तीची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी. या संदर्भाच्या सूचना आरोग्य विभागातून देण्यात आल्या आणि सचिवास तात्काळ उपायोजना करून अहवाल सादर करण्यात यावा. अशा सूचना देण्यात आल्या. गावात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यामुळे गावातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी गावातील अस्वच्छता लवकरात लवकर दूर व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.