वाघोबा- नागोबा आमने सामने येतात तेव्हा...!chandrapur



वाघोबा- नागोबा आमने सामने येतात तेव्हा...!

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :- 
हिंदू समाजातील श्रावण मासातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी या नागपंचमीला हिंदू समाजात विशिष्ट महत्व प्राप्त आहे. एवढेच नाही तर हिंदू देवदेवतात नागोबा आणि वाघोबा यांनाही पूजण्याची प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. अशातच जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नागपंचमीच्या पूर्वसंध्येला वाघोबा आणि नागोबा यांचा आमना सामना झाला या पंचवीस मिनिटात पर्यटकांना एक क्षण असे वाटले की, आता काहीतरी विचित्र होईल अशी भावना निर्माण झाली होती. परंतु ताडोबात मक्तेदारी असलेल्या वाघोबाला दोन पावलं मागे जावे लागले. तर नागोबा टक लावत त्याच्याकडे पहात राहिले. असा हा थरारक प्रसंग गुरुवारी वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार   अफरोज  शेख व त्याचे सहकारी प्रकाश दूधकोर  यांनी आपल्या कॅमेरात टिपले. चंद्रपुरात ताडोबा जंगल मध्ये आतापर्यंत वाघाच्या आणि अस्वलांच्या  शिकारीच्या करामती  पर्यटकांनी अनुभवल्या. मात्र वाघोबा आणि नागोबा यांच्या आमने -सामने आल्याने  करमती  पर्यटकांना पाहाव्यास मिळाल्या. सध्या ताडोबा सफारी पर्यटक का साठी काही दिवस बंद असली तरी गेल्या दोन-तीन  वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बप्पर क्षेत्रातील वाघाचा बोलबाला अधिक असून पर क्षेत्राला पर्यटकाची पहिली पसंती वाघ पाहण्यासाठी दिल्या जात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बेलोरा पाण्याच्या झर्‍याजवळ वाघ आराम करत बसला असताना तेवढ्यात समोरून कोब्रा नाग आला. वाघाला भनक लागायच्या अगोदरच कोब्रा नाग फणा काढून त्याच्यासमोर अचानक वाघाला उभा  दिसताच  वाघही दोन पावले मागे सरकला  आणी जागी बसून एकमेकाकडे पाहत दोघांनी 25 मिनिटे घालवली  हा दुर्मिळ अनुभव पर्यटकांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर जंगलात वाघच नाही तर इतरही प्राण्याचे जंगलात अस्तित्व असल्याचे दिसून येत आहे.