मोरवा जि.प.शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज दिनांक २ आक्टोंबर २०२४ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवा येथे अहिंसे पुजारी पुज्यनिय महात्मा गांधी व पुज्यनिय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मान.शंकर आत्राम मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.सचिनभाऊ साव अध्यक्ष शा.व्य.स. मोरवा प्रमुख पाहुणे मान.भूषणभाऊ पिदुरकर उपसरपंच ग्रामपंचायत मोरवा,मान.रजनीताई पिदुरकर सदस्य शा.व्य.स.व मान.शंकर चौधरी प्रतिष्ठित नागरिक, मान.विद्या डहारे व मान.प्रणाली यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मान.शंकर आत्राम यांनी केले. या कार्यक्रमाचे संचलन मान. अर्जुन चव्हाण वि.शि. यांनी केले.आभार प्रदर्शन मान.वैशाली चल्लावार प्राथ.शि.यांनी केले.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मान.विनोद लोखंडे प्राथ.शि.व प्रविण डोर्लीकर प्रा.शि यांनी सहकार्य केले.