उमेदवारांची तळमळ, गोठलेले मन रिजवण्यात ! .... या उमेदवारांच्या गळ्यात पडणार विजयाची माळ?




उमेदवारांची तळमळ, गोठलेले मन रिजवण्यात !

.... या उमेदवारांच्या गळ्यात पडणार विजयाची माळ?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- c
महाराष्ट्रात येत्या 20 तारखेला सर्वत्र विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकीचा दिवस जवळ येत आहेत तस तशी उमेदवाराची प्रचार यंत्रणा
जोमात सुरू आहे. यासाठी उमेदवाराकडून गोठलेल्या मतदारांचे मन रिजवण्यात तळमळ सुरू आहे.
अनेक उमेदवाराचे चेहरेही मतदारांच्या डोळ्यासमोर आले नाहीत. भावी आमदाराचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवाराचे चेहरे पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थ ताटकळत आहेत.
काही उमेदवार जनशक्ती तर काही धनशक्तीच्या जोरावर, तुल्यबळ फौज नसल्याकारणाने अनेक मतदारांकडे ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात पोहोचले नाहीत.
परंतु काही राजकीय पक्षाच्या तुल्यबळ असणाऱ्या पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा वानवा भासत आहे. बंडखोराची फळी प्रत्येक राजकीय पक्षात वनवा लावत आहे. शरीराने जरी पक्षात असले तरी मनाने मात्र दू तोंडी प्रचार चालू आहे. असा फटका मात्र महायुतीत जास्त पाहायला मिळत असून यामुळे उमेदवार अडचणीत येतील का अशी शंका निर्माण होत आहे. कसे चालले म्हटले तरी, परिस्थिती वातानुकूल नसून सध्या सामाजिक विश्लेषणातून जातीय समाजकारणातून फार मोठी ठिणगी उठल्याचे सामोर येत आहे. अशा परिस्थितीत
ना कोणावर रागावत येत आहे. ना कोणाला दूर करता येत आहे. त्यामुळे असला काय? नसला काय? कार्यकर्त्यावर विश्वास दाखवावाच लागतो. नाहीतर कार्यकर्त्यांना दुसरा पर्याय उपलब्ध असल्याने ते दुसरीकडे निघून जाऊ शकतात. तसेही अनेक कार्यकर्ते दिवसा एका नेत्याकडे अन् रात्री दुसऱ्याकडे वावरत असल्याच्या चर्चा सुरू आहे.
नाईलाजास्त्व उमेदवारांना कार्यकर्त्यांना सांभाळून घ्यावे लागत आहे.
प्रत्येक उमेदवाराकडे एक सोशल मीडिय असल्याने, प्रसार माध्यमातील बातम्यांचा आणि जाहिरातीचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे उमेदवाराचे कार्य, वचननामे माध्यमातून मतदारापर्यंत वाचन स्वरूपात पाहायला मिळाले नाहीत. माध्यमातून कोणाची हवा आहे अशी चौकाचौकात चर्चा व्हायची, राजकीय विश्लेषण आणि आराखडे बांधले जायचे, परंतु या सोशल माध्यमाने चर्चा बंद झाली. तशी उमेदवाराच्या प्रचारासाठी होणारी गर्दी ही फसवी असल्याचे आता नागड्या बाळालाही समजते.
प्रत्येक सभांमध्ये असणारे तेच चेहरे, ते उमेदवारासाठी आले नसून आपल्या रोजी रोटी साठी येतात. कशावरून राजकीय गणित लावणे हे सर्वसामान्यसह उमेदवारांनाही समजते.पूर्वी मतदार आपल्या मनातील भावना आपल्या जवळच्या लोकांसमोर बोलून दाखवायचे. त्यामुळे हळूहळू उमेदवाराची हवा बनायची. परंतु अलीकडे मतदार मोबाईल आणि टिव्हीत ग्रस्त झाल्यामुळे मनातल्या गोष्टी बोलून दाखवत नाही. अलिकडे मनमोकळ्या गप्पा मारल्या जात नाही. मनातल्या भावना मनातच असल्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाजही बांधता येत नाही.
त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारासह अनेकांच्या काळजाचे ठोके धकधक करीत आहेत.
अर्थकारणातूनही मतदारांना लोबवण्याचा किडसवाना प्रकार करून आमदार बनण्याची संधी सोडायची नाही.
या इरसेने उमेदवारांचे कार्यकर्ते गावागावातील उंबरटे पिंजून काढत आहेत.
   चंद्रपूर विधानसभा साठी राजकीय पक्षांसह बंडखोरीत असलेले  अपक्ष उमेदवारांचे मत विभाजन करून कोणाला डुबवणार याचा अंदाज बांधणे राजकीय जाणकारांना सुद्धा कठीण झाले आहेत. ही स्थिती बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात, दोन राजकीय पक्षांच्या शर्यतीत एका महिला अपक्ष  उमेदवारामुळे  मुरब्बी राजकीय  नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजुरा विधानसभा मतदार क्षेत्रात माजी आमदार च्या तुलनेत अपक्ष आमदार याची घोडदळ सुरू आहे. तर महायुतीच्या उमेदवाराची जमानत जप्त होईल काय अशी परिस्थिती आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात दोनदा निवडून आलेले आमदार यांची यावेळेस चांगलीच लागण्याची शाश्वती असून कुठलेही बंडखोर नसल्यामुळे काँग्रेस उमेदवाराचे एकंदरीत चांगभले होईल असे जाणकाराचे मत आहेत. ब्रह्मपुरी  विधानसभा क्षेत्रात रनिंग आमदार त्यांच्या तुलनेत महायुतीचे उमेदवार तुल्यभर नसून एकेरी लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरोरा भद्रावती विधान परिषद क्षेत्रात पंचरंगी लढत असून  भाऊच्या हट्टा पायी बाईची  दमछाख होत असून  नाईंटीला  येथील जनता नाकारेल असे चित्र दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सहावी विधान परिषद क्षेत्राचे एकंदरीत परिस्थिती पाहता क्षेत्रातील लढतीचा अजूनपर्यंत अंदाज लागलेला नाही. कोणी म्हणतो दुहेरी लढत होईल, कोणी म्हणतो तिहेरी, कोणी म्हणतो पंचरंगी असे आपापल्या परीने अंदाज वर्तवत आहे.  कार्यकर्ते आणि उमेदवार संभ्रमात असले तरी  जनतेने मात्र आपलं अमूल्य मत कुणाला द्यायचं हे निश्चित केला आहे.
आता प्रचार तोफा थंडावल्या असून
मागील पंधरा दिवसापासून विधानसभा निवडणुकीसाठी उडालेला प्रचाराच्या धुरळा हा सोमवारी सायंकाळी पाच वाजता  शमवणार  आहेत.
सहा मतदारसंघात जिल्ह्यात 95 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. एक विधानसभा सोडली तर पाचही विधानसभेत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. 
तसेच २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असून प्रचाराच्या सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. यातच प्रचारांसाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्याही सभा विविध मतदारसंघात पार पडत आहेत. तसेच सर्वच पक्षांकडून जनतेला मोठी आश्वासनेही देण्यात येत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे  चंद्रपूर जिल्ह्याच्या सहाही विधानसभा क्षेत्राकडे लागले आहेत.याचे  आता 20 तारखेला जनता कोणाच्या गळ्यात माळ घालेल याचे चित्र 23 तारखेला स्पष्ट होणार आहेत.