स.प. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्त विविध कार्यक्रम
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू इसा शेख व पदाधिकऱ्यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर येथील मोरवा येथील मती मंद शाळेत जाऊन अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू भाई इसा शेख ह्यांच्या वतीने तेथील विध्यार्थ्यांन सोबत प्रजासत्ताक दीना निमित्य सह भोजन करण्यात आले .त्यावेळेस मती मंद शाळेचे शिक्षक सह इतर कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, सोशिअल मीडिया जिल्हा अध्यक्ष नितीन पिंपळशेडे महासचिव मोहन सिंग ठाकूर, अन्सार भाई, प्रदीप भाऊ, मिनाज भाई, विनोद भाई युनूस भाई तसेच अनेक अल्पसंख्यांक पदाधिकारी उपस्थित होते.तुकूम परिसरातील तुकूम आटो संघटने तर्फे झेंडा वंदन करण्यात आला. यावेळी अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू इसा शेख ह्यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले शालेय विध्यार्थ्यांना मिठाई चे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तुकूम आटो संघटनेचे पदाधिकारी विनोद भाई, मिनाज भाई, युनूस भाई, मनानं भाई व इतर पदाधिकारी उपस्थिती होते.