जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का,
जिल्हाप्रमुख शिंदेंच्या सेनेत !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेतला. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुकेश यांनी बंडखोरी करीत वरोरा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली. त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पण तरीही त्यांचे जिल्हा प्रमुख पद कायम राहिले होते. आज अचानक त्यांनी मुंबई गाठत थेट पक्ष बदलला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख शिंदे सेनेत प्रवेश घेतल्याने जिल्ह्यात पुन्हा एक ठाकरे गटाला खिंडाळ पडली आहे .
अजूनसध्या त्यांना कोणतेही पद देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश यांच्या शिवसेना प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. वरोरा - भद्रावती क्षेत्रात त्यांचा राजकीय प्रभाव मोठा आहे.