चंद्रपूर शहरात बारमध्ये पोलिसाचा खून, एक जखमी



चंद्रपूर शहरात बारमध्ये पोलिसाचा खून, एक जखमी


खून करणारे आकाश शिर्के, मल्लिक व इतर पाच आरोपीना पोलिसांनी घेतले ताब्यात.

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- chandrapur crime

शहरातील पठाणपुरा रोड च्या पिंग पॅराडाईज बार मध्ये आज रात्री आकाश शिर्के, मल्लिक व इतर पाच आरोपीनी पोलीस कर्मचारी असणारे दिलीप चव्हाण, संदीप चाफले यांच्यावर शुल्लक करणावरून वाद झाल्याने खुनी हल्ला केला असून त्या हल्ल्यात दिलीप चव्हाण ह्या पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर संदीप चाफले ह्या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातुन हलवून खाजगी रुग्णालय असलेल्या चेपूरवार यांच्या रुग्णालयात भरती केले परंतु त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती असून या घटनेने चंद्रपूर शहर हादरले आहे.

शहरातील पठाणपुरा रोड च्या लगतं असलेल्या पिंग पॅराडाईज बार मध्ये आज रात्री 9.00 च्या दरम्यान काही इसम हे दारू पीत असतांना तिथे पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण, संदीप चाफले हे आपली ड्युटी संपल्यावर त्या बार मध्ये आले असतां त्यांच्यासोबत बाच्याबाची झाली, अतिशय मद्य सेवन केलेल्या आरोपी ला या पोलीस कर्मचाऱ्यांनी समजावून जास्त आवाज करू नको असे सांगितले, मात्र आरोपी ने आपले काही सहकारी बोलावून त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने खुनी हल्ला केला त्यात दिलीप चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून संदीप चाफले हे जखमी आहे, या घटनेने चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीना जेरबंद केले आहे. या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली असून शहर पोलीस स्टेशनं येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे, दरम्यान बार मालक बानकर व इतर बार कर्मचारी यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनं येथे आणले आहे, मृत पोलीस दिलीप चव्हाण यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पीएम करिता ठेवण्यात आला आहे.