आता महाराष्ट्रात फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी डोमेसिअल बंधनकारक !
दिनचर्या न्युज :-
मुंबई :-
महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयाकडून शहरात रस्त्यावर ठेले लावून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण फार वाढले आहेत. मात्र यावर महाराष्ट्र शासनाने इतर राज्यांमध्ये
फेरीवाल्यांच्या परवान्यासाठी डोमेशियल बंधनकारक आहे. त्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रातील शहरात किंवा कुठेही रस्त्यावर ठेले वाल्यांना व्यवसाय करण्यासाठी आता डोमेसिअल बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कुणी येणार, रस्त्यावर व्यवसाय करणार हे चालणार नाही असे मुंबई हायकोर्टाने सांगितले.
मुंबई हायकोर्टाने आदेश जाहीर केले आहे की, फेरीवाले हा महाराष्ट्रातीलच रहिवासी असले पाहिजे. परप्रांतीयांना आता महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने डोमेशियल अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता परप्रांतीयातून येणाऱ्या लोंढ्यांचे, आणि फूटपाथवर व्यवसाय करण्याचे मनसुबे धुडीस मिळणार आहेत. इतर राज्यातून येणाऱ्या फुटपाथवर ठेले टाकून व्यवसाय करणाऱ्या मुळे महाराष्ट्रातील रहिवाशांना फेरीवालाना फूटपाथवर व्यवसाय करण्यासाठी फार मोठी तारेवरची कसरत करावी लागत असे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील फेरीवाल्यांना दिलासा मिळाला आहे.