128 वी महात्मा फुले पुण्यतिथी व समता पुरस्कार वितरण सोहळा


धुळे, प्रतिनिधी
 बुधवार दि 28 नोव्हेंबर 2018 स्थळ समता भूमी महात्मा  फुले स्मारक पुणे या ठिकाणी मा प्रतिभा पाटील  माजी राष्ट्रपती भारत सरकार यांच्या शुभहस्ते मा शरद पवार माजी कृषिमंत्री भारत सरकार याना या वर्षाचा समता पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री उपेंद्र कुशवाह मानव संसाधन राज्यमंत्री भारत सरकार व मा ना गिरीश बापट पालकमंत्री पुणे जिल्हा हे उपस्थित असतील

 तसेच मा ना विजय शिवतारे जलसंपदा राज्यमंत्री म राज्य,मा ना दिलीप कांबळे समाजकल्याण राज्यमंत्री म राज्य ,मा सौ मुक्ता टिळक ,महापौर पुणे,व मा श्री राहुल जाधव महापौर पिपरी चिंचवड यांची सन्माननीय उपस्थित राहणार आहे
राज्याचे  माजी उपमुख्यमंत्री व अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे तरी धुळे जिल्ह्यातील सर्व समता सैनिकांनी व भुजबळ समर्थकांनी  पुणे येथे होणाऱ्या  समता पुरस्कार वितरण सोहळ्याला हजरोच्या संख्येने  उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेश बागुल यांनी केले आहे