माळमाथा परिसर विकासापासून वंचित

अशोक मुजगे 
कार्यक्षम राजकीय नेतृत्वाचा अभाव


निजामपूर/प्रतिनिधी 
परिसरातील सर्वात मोठे गाव म्हणून जैताणे निजामपूर परिसर ओळखला जातो. पण याच परिसराला आता दुष्काळाने वेढा दिला आहे दुष्काळी परिस्थितीत परिसरातील शेतकरी मेंढपाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे सुरुवातीला साक्री तालुका हा राज्यातील दुष्काळसदृश्य तालुक्यातून वगळला गेला त्याचा परिणाम माळमाथा परिसरातील शेतकरी व मेंढपाळांवर झाला.  यावर्षी परिसरात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली असून पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच वणवण सुरू झाली आहे. त्यात कष्टकरी समजला जाणारा शेतकरी हा देखील हा सरकारी अनास्थेचा बळी पडला आहे. शेतकऱ्यांना आत्तापासूनच जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या सतावत आहे. गुरं हे विकण्याची वेळ आता त्यांच्यावर आहे.  आज पासून तर जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातून येणारे उत्पन्न हे शून्य आहे.  त्यामुळे माळमाथा परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे तसेच जैताणे परिसरात प्रामुख्याने मुख्यव्यवसाय म्हणून होत असलेला मेंढपाळ व्यवसाय अधिक मोठ्या संकटात सापडला आहे मेंढपाळांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे फक्त मेंढपाळ एकटा स्थलातरीत होत नसून त्याच्यासोबत त्याचे कुटुंब व त्यांच्या मुलांना देखील शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आहे. आणि या सर्वांना साक्री तालुक्यातील व परिसरातील अकार्यक्षम राजकीय नेतृत्व जबाबदार आहे. 
पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून व विविध सरकारी योजनांपासून उपेक्षित व वंचित असणारा धनगर समाज हा हे भीषण दुष्काळ मोठ्या संकटात सापडला आहे. आपल्या आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज वर्षानुवर्षे भटकंती करत आहे आणि याच भटकंतीचा काही समाजकंटकांनी फायदा घेत या समाजाला विविध शासकीय योजने योजनेपासून वंचित ठेवले गेल्या काही वर्षापासून निसर्गाने चांगली साथ दिल्यामुळे थोड्याफार प्रमाणात भटकंती थांबली होती पण या वर्षाचा भीषण दुष्काळ पाहता मेंढपाळांवर व धनगर समाजावर पुन्हा एकदा भटकंतीचे दिवस आले आहेत ते एकट्यावर नसून त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य वर त्याचा परिणाम होताना दिसत आहे अनेकांची मुलं चांगल्या महाविद्यालयांमध्ये आपल्या स्वकर्तुत्वावर महाविद्यालयीन शिक्षण घेत असून त्यांच्या शिक्षणावर व मनावर याचा नक्कीच मोठा परिणाम येणाऱ्या पुढील काळात दिसून येईल 
या सर्व गोष्टींसाठी साक्री तालुक्यातील राजकीय नेतृत्व कुठेतरी जबाबदार असल्याची भावना सर्वसामान्याच्या मनात आहे. आज पर्यंत एवढ्या भीषण दुष्काळी परिस्थितीत कोणतेही राजकीय पुढाऱ्यांनी शासनाला परिसरात चारा छावणी व्हावी व जनावरांना पिण्यासाठी टॅंकर सुरू व्हावी अशा स्वरूपाचे शासनाकडे मागणी किंवा निवेदन देखील सादर करण्यात आलेले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. अशा अकार्यक्षम नेतृत्वामुळे अनेक कुटुंबांवर याचा फार मोठा परिणाम येणाऱ्या काळात दिसेल या भीषण दुष्काळाची लढण्यासाठी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र यावे व या गंभीर प्रश्नावर पर्याय काढण्यासाठी मदत करावी असे आवाहन जैताणे गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक मुजगे यांनी केले आहे.