शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू

महासंघाच्या प्रदीर्घ लढ्याला यश



जुन्नर / आनंद कांबळे
शिक्षकेतर कर्मचारी यांना दुसरी आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू होण्यासाठी गेले ७/८ वर्ष महासंघाच्या वतीने विविध आंदोलन व निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता परंतु महासंघाच्या वतीने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाजूने 4 ऑक्टोबर 2018 अंतिम निकाल लागू झाला.

या याचिकेतील आदेशानुसार शिक्षकेतर कर्मचारी ( लिपिक व सेवक ) त्यांना 24 वर्ष पूर्ण केल्यानंतरची निवड श्रेणी अर्थात दुसरी आश्वासित प्रगती योजना लागू करावी यासाठी आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक मा.सौ.मिनाक्षी राऊत तसेच शिक्षण संचालक कार्यालयात

अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी पुणे,नगर व प्रशासन अधिकारी पुणे,नगर मनपा यांना यासंदर्भात आदेश लागू करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार तात्काळ यासंदर्भातले आदेश न्यायालयाच्या अधीन राहून लागू करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक सौ. मिनाक्षी राऊत यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले अशी माहिती संघटनेचे राज्य सहसचिव. विकास थिटे यांनी दिली.

महासंघाच्या शिष्टमंडळात पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे, राज्य सहसचिव विकास थिटे , पुणे जिल्हा सचिव जितेंद्र पायगुडे , शिक्षकेतर प्रमुख मारुती माळवदकर , मावळ तालुकाध्यक्ष आनंद गावडे तसेच श्रीकृष्ण सावरगावकर, वंदना गोडबोले, व्यंकटेश जोशी, श्रीकांत काकतकर,शोभा आगटे, लक्ष्मण लोखंडे, अनिल जगताप , मनोहर भोसले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.