पर्यावरणाच्या संतुलनासाठी शेतकऱ्यांना ८ तास वीज : विश्वास पाठक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू असला तरी शेतकऱ्यांना कृषी पंपाना 8 तास वीज पुरवठा केला जातो, याचा अर्थ 16 तास भारनियमन नाही. 16 तास भारनियमन आहे हा गैरसमज पसरविण्यात येत आहे, अशी माहिती मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक श्री विश्वास पाठक यांनी चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. श्री पाठक यांची ही 27 वी पत्रपरिषद होती. सध्या त्यांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे.

याप्रसंगी बोलताना श्री पाठक म्हणाले- मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा विभागाला 4 वर्षे पूर्णे झाली आहेत. या चार वर्षात ऊर्जा विभागाने घेतलेल्या निर्णयाची माहिती पत्रकारांसमोर ठेवताRना पाठक म्हणाले-वीज ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा कशा करता येतील, ऊर्जा विभागाच्या कामे आणि योजनाची वस्तुस्थिती ग्राहकांसमोर ठेवणे हा या संवादाचा उद्देश आहे.

विजेच्या सर्व समस्या सुटल्या असा कोणताच आमचा दावा नाही. अजूनही बरीच कामे आणि सुधारणा करण्यास वाव आहे. पण 4 वर्षात झालेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवणे आवश्यक होते.

राज्यात भारनियमन नाही असा दावा करताना श्री पाठक म्हणाले- ज्या ठिकाणी वीज खंडित असेल ते भारनियमन नाही, तांत्रिक कारणाने वीज पुरवठा खंडित असतो, याकडेही पाठक यांनी लक्ष वेधले.

या संवादा दरम्यान श्री पाठक यांनी HVDS, मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी, कोळसा पुरवठा, पारेषणचे जाळे, शेतकऱ्यांना 4 वर्षात 5 लाख कृषीपंपाना कनेक्शन, भूमिगत वाहिन्या आदी विषयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.22 ऑक्टोबर रोजी 24962 मेगावॅट इतकी उच्च मागणी असताना, सक्षम व मजबूत पारेषन जाळ्यामुळे व करण्यात आलेल्या विविध संचलन व सुव्यवस्थेच्या कामामुळे व आधुनिकीकरणामुळे , या दिवशी 20हजार 630 मेगावॅट वीज पुरवठा विना व्यत्यय करता आला असे ते या प्रसंगी म्हणाले.