समाजाचे नवनिर्माण तरुणाईच्या सहभागावर अवलंबून - विनित पवार

अण्णापूर (ता.शिरुर ) पाडव्याच्या पुर्वसंध्येला श्रीमंत पवार राजे घराणे सामाजिक प्रतिष्ठान आयोजित दिपोत्सव व स्नेहसंमेलनात उपस्थित राज्य मार्गदर्शक विनित पवार, उपाध्यक्ष मनोहर पवार, सभापती विठ्ठल पवार व इतर सदस्य 


अण्णापूर (प्रतिनिधी ) मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामात धारच्या श्रीमंत पवार घराण्याचे मोलाचे योगदान असुन हा दैदीप्यमान इतिहास नवीन पिढीला माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. इतिहासापासुन बोध घेत समाजाच्या नवनिर्माणासाठी तरुणाईने तयार असायला हवे कारण समाजाचे नवनिर्माण तरुणाईच्या सहभागावर अवलंबून असल्याचे मत श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सल्लागार विनित पवार यांनी व्यक्त केले. 
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान व अण्णापूर येथील पवार परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी पाडव्याच्या पुर्वसंध्येला पवार वाड्यातील विठ्ठल मंदिरात दिपोत्सव व पवार परिवारांचा स्नेहमेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या धार संस्थानच्या गादीस प्रमुख मानून महाराष्ट्रातील तमाम धार पवार बंधुना संघटित करणे, त्यांची सामाजिक ,आर्थिक व शैक्षणिक उन्नती घडवुन आणण्यास सहाय्य करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असुन पवार घराण्याचा दैदिप्यमान इतिहास ग्रंथ स्वरूपात शब्दबद्ध करणे हेही काम भविष्यात करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णापूर मधील बोल्हाईमाता मंदिर ते पवारवाड्यातील विठ्ठल मंदिरापर्यंत मिरवणूकीने पवार परिवारातील सर्व सदस्य आल्यावर श्रीमंत पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक विनित पवार , उपाध्यक्ष मनोहर पवार ,शिरुर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार व सर्व पुरुष व महिला सदस्यांनी विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात पणत्या लावुन दिपोत्सव साजरा केला .यावेळी दिव्यांच्या रोषणाईने अवघा पवारवाडा उजळुन निघाला होता. पवार परिवारातील सर्व सदस्य यानिमित्ताने खुप दिवसांनी एकत्र आल्याने नव्या व जुन्या पिढीतील गप्पांना रंग चढला होता. 
 यावेळी झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी सदस्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य गौरव पवार,अण्णापूरचे माजी उपसरपंच मोहन पवार, हभप विलास महाराज पवार, दुध डेअरीचे चेअरमन हनुमंत पवार, पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष शहाजी पवार ,उद्योजक सुरेश पवार, प्रा. सुभाष कुरंदळे, हभप रंगनाथ पवार, डॉ .कोमल पवार यांच्यासह पवार परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्य महेश कुरंदळे, उद्योजक संजय पवार, गहिनीनाथ डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर भाऊसाहेब पवार , युवा नेते शंकर पवार,उमेश पवार , गणेश पवार , अमित पवार , अजित पवार, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष शरद पवार,किरण पवार , राजेंद्र पवार, उद्योजक हनुमंत पवार, दादा पवार , वरुण पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिरुर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार हे होते. या प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच आमदाबाद या ठिकाणी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असुन लाखापेक्षा जास्त सदस्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय येत्या १४ जानेवारीला कवठे येमाई येथील पवारांच्या गढीवर शौर्यदिनाचे आयोजन होणार असुन यावेळी पुर्वजांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल पवार यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक हभप विलास महाराज पवार यांनी , सुत्रसंचालन ब्रिटिश कौन्सिलचे राज्यमार्गदर्शक ज्ञानेश पवार यांनी केले. तर सर्वांचे आभार युवानेते वरुण पवार यांनी मानले.