धनगर समाजाने कधी जल्लोष करायचा?


गणेश न्याहळदे /धुळे, खबरबात
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज चार वर्षे उलटूनही धनगर आरक्षणाचा प्रश्न या सरकारने मार्गी लावलेला नाही .धनगर समुदायाने कधी जल्लोष करायचा याची तारीख मुख्यमंत्र्यांनी सांगावी,अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती व समस्त धनगर समाज जैताने यांनी केली आहे.

धनगर आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी टिस या संस्थेला या सरकारने काम दिले होते.आरक्षणाचा सर्व अभ्यास करून चार वर्षानंतर हा अहवाल संस्थेने सरकारकडे दिला आहे.त्यानंतरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी, एक महिना या अहवालाचा अभ्यास करून धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल ,असे आश्वासन दिले होते परंतु मुख्यमंत्र्यांना याचा विसर पडलेला दिसतो आहे. केवळ केंद्र शासनाकडे अहवाल सादर करणे एवढेच काम नाही तर त्याचा तात्काळ पाठपुरवठा करून धनगर आरक्षण ची आंबलबजावनी झाली पाहिजे असे अशोक मुजगे म्हणाले.

ज्या वेळेस धनगर समाजाला जातीचे प्रमाणपत्र हातात पडतील त्याच वेळी धनगर समाजला आरक्षण मिळेल , परंतु हे सरकार केवळ चालढकल करीत आहे. चालू अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा व धनगरांना जल्लोषाची तारीख सांगावी आता धनगरांचा अंत पाहू नका अन्यथा धनगर समाज संघर्ष समिती तर्फे आंदोलनाचा इशाराही अशोक मुजगे यांनी दिला