शिरकळस येथे संविधान दिन साजरा

गोविंद मठपती/ताडकळस: 

आज दि.26 नोव्हेंबर2018 रोजी जि.प.प्राथमिक शाळा शिरकळस ता.पूर्णा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावात संविधान जनजागरण रॅली शाळेमार्फत काढण्यात आली.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच श्री संजयराव भोसले यांची उपस्थिती लाभली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री विष्णुपंत भोसले,श्री रामप्रसाद भोसले तसेच पत्रकार श्री धम्मपाल हनवते यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रम प्रसंगी प्रास्तविक श्री पवार महेश सर यांनी मांडले तर विद्यार्थ्यांना मु.अ.श्री ब्रह्मा ढगे सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.संविधानाची उद्देशिका म्हणून या संविधान दिनाची सांगता करण्यात आली.