सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करा


Agricultural University should be provided | सिंदेवाहीत कृषी विद्यापीठ द्यावे
 सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ मंजूर करावे या मागणीचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने कुलगुरु डॉ. विलास भाले यांना देण्यात आले.
सिंदेवाही कृषी विद्यापिठाच्या मागणीसाठी अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कुलगुरु डॉ. विलास भाले यांना समितीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी महोत्सवाचे उद्घाटक आमदार विजय वडेट्टीवार, संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक डेंगानी, संदीप बांगडे, मयूर सुचक, बालू तुम्मे, अनूप श्रीरामवार, अलोक सागरे व सदस्य उपस्थित होते.