महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘चला ताण घालवू या’ तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

महावितरण चंद्रपूर परिमंडळात कार्यरत, महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळ द्वारा महावितरणच्या कर्मचार्यांना धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त जीवन जगण्याच्या आयोजन टिप्स मिळाव्या याकारीता मुख्य अभियंता श्री. अरविंद भादिकर यांच्या सुचनेनुसार ,3 नोव्हेंबर रोजी ‘चला ताण घालवू या’ तणावमुक्ति कार्यशाळेचे आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात, आयोजन करण्यात आले हेाते. प्रख्यात संम्मोहन तज्ञ श्री. नवनाथ गायकवाड यांचे चिरंजीव श्री. प्रषिक नवनाथ गायकवाड यांनी उपस्थितांना तणावमुक्त जीवन जगण्याबाबात मार्गदर्शन केले. संम्मोहनातून मानवी मन सकारात्मकपणे कसे कार्य करते याचे प्रात्यक्षिकासह त्यांनी सादरीकरण केले. स्वसंम्मोहनातून मानवी मनातील नकारात्मक विचार घालवून टाकणे, भिती किंवा फोबिया नष्ट करने, व्यसनाधिनतेपासून मुक्ति मिळवता येत असल्याचे त्यांनी त्याच्या मार्गदर्षनातून दाखविले.
याप्रसंगी अधिक्षक अभियंता चंद्रपूर श्री. अशोक म्हस्के, अधिक्षक अभियंता गडचिरेाली श्री.अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार, प्रशांत राठी, किशोर पिजदूरकर, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी श्री. सुशील विखार तसेच इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकुटूंब उपस्थित राहून माठया संख्येत लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळाचे श्री. विजय चावरे, भालचंद्र घोडमारे, बंडू कुरेकार, अमित बिरमवार, नंदकुमार नरड, ललित निमकर, निवलकर,सिद्धार्थ खोब्रागडे, शिल्पा महेशगौरी व रोहिणी ठाकरे यांनी विषेश प्रयत्न केले.