डम्पिगमुळे जीव टांगणीला


चिमूर/रोहित रामटेके
चिमूर:- भारतामध्ये नदी स्वच्छतेवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे. संपूर्ण भारतातील सर्व नद्या प्रदुषण मुक्त करण्याचा मानस आहे . पण नगर परिषद चिमुर कडुन नदिच्या पात्रामध्येच डम्पीग लावण्यात येउन नदि स्वच्छतेचे तीन- तेरा वाजविण्यात आले. डम्पीग चिमूर शहरालगत असल्यामुडे नागरिक व जनावरे यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 


पर्यावरण संवर्धन समितीचे मुख्याधिकारी यांना घेराव
नदिचे पात्र प्रदुषित होउ नये आणी जनता व जनावरे यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी पर्यावरण संवर्धन समीती चीमुर कडुन डंम्पीग हटविण्यासाठी चिमुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज शहा यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. यावेडी पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडु लोहकरे, निखील भालेराव, ऋषिकेश बाहुरे, संदिप कीटे, सौरभ गायकवाड, केमदेव वाटगुरे, प्रफूल शेडामे, पंकज बंडे, समीर बंडे, आशीष ईखारे,मोहण सातपैसे आदि पर्यावरण समीती सदस्य होते