काँग्रेसच्या नगरसेवकाचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश


उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिरीष भांगे यांच्या प्रयत्नाने कारंजा येथील काँग्रेसचे नेते तथा नगरसेवक संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक परीवहन नितीन गडकरी यांच्या हस्ते तथा चंद्रशेखर बावनकुळे उर्जा मंत्री महाराष्ट्र व माजी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात रितसर प्रवेश घेतला. प्रवेश घेणाऱ्यांमध्ये कारंजा  ग्रा.पं.चे माजी सदस्य निलेश मस्की, विजय मांडोकर, हेमंत बन्नगरे,नितिन बनकर, सचिन राऊत, सागर मानकर ,सुधाकर मानकर, आकाश कदम,राहुल चरपे, आकाश कळसकर, शाम कळसकर, स्वप्निल बनकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

प्रवेश घेणारे सर्व कारंजा परीसरातील दिग्गज काँग्रेसचे नेते असल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. त्यामुळे कारंजा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची पकड मजबूत झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. माजी आमदार दादाराव केचे यांच्या माध्यमातून आर्वी विधानसभा क्षेत्रात होत असलेली विकास कामे, कार्यकर्त्यां प्रती असणारी संवेदनशीलता सर्वज्ञात आहे. त्यामुळे कारंजा तालुक्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी दादाराव केचे यांच्या शिवाय पर्याय नाही असे संजय कदम यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते हरीभाऊ जसुतकर, तेजराव बननगरे, पंजाबराव टूले, शिरीष भांगे,शरद बोके, किशोर भांगे, सुनील वंजारी, नगरसेवक निसारभाई शेख,दिलीप जसुतकर,सारंग भोसले,शिवम कुरड़ा तसेच जेष्ठ पत्रकार जगदिशजी कुरड़ा उपस्थित होते.