जैताणे-लांडग्यांच्या हल्ल्यात 12 मेंढ्या ठार

धुळे- जैताणे गावात कल दि(25) रात्री श्री दादाभाई रघुनाथ पगारे रा जैताणे(साक्री)यांच्या शेतात त्यांच्या 22 मेंढ्यावर रात्री लांडग्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात तब्बल 12 मेंढ्या ठार तर दोन मेंढ्या गंभीर जखमी झाल्याची घटना जैताणे गावात घडली त्यात दादाभाई पगारे यांच्या पशुधनाचे तब्बल 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहिरींनी तळ गाठला आहे शेती पूर्णपणे पडली असून अश्या परिस्थितीत उदरनिर्वाहाचे साधन म्हणून व शेती पुरक जोडधंदा म्हणून श्री दादाभाई पगारे व त्यांचा मुलगा गोपाल दादाभाई पगारे यांनी 22 मेंढ्या विकत घेऊन मेंढी पालन व्यवसाय सुरू केला होता. पण काल रात्री घडलेल्या घटनेमुळे त्यांची स्थिती आणखीच बिकट झाली. मेंढ्या विकत घेऊन त्यांचे पालन पोषण करून दुष्काळात आपल्या उत्पन्न चे साधन म्हनून या कडे लक्ष दिले तजात होते. आपल्या कांद्याच्या चाळीत दररोज ते आपल्या 22 मेंढ्या रात्री सुरक्षिततेसाठी ठेवायचे परंतु काल रात्री लांडग्यांच्या कळपाने सामूहिक हल्ला करून चाळीची जाळी कोरून खालून त्यांनी तब्बल तीन मेंढनर व नऊ मेंढ्या ठार केल्या

वनविभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल
सदर घटनेची माहिती वन विभागाला दिली असता वन विभागाचे अधिकारी पी ए जगताप वनपाल कोंडाईबारी व त्यांचे कर्मचारी तात्काळ घटना स्थळी उपस्थित झाले व घटनेची पाहणी करून पंचनामा केला

पशुवैद्यकीय अधिकारीतसेच पशुधन अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती साक्री भाग निजामपूर याना वनविभागाने शवविच्छेदन करण्यास अहवाल पाठवण्यात आला आहे *वनपाल क्षेत्रअधिकारी कोंडाईबारी यांना विनंती अर्ज श्री दादाभाई रघुनाथ पगारे यांनी केला आहे त्यांच्या मालकीच्या कोंडलेल्या 22 मेंढ्या वर लांडग्यांच्या कळपाने मेंढ्यावर हल्ला केला असून त्यात बारा मेंढ्या मृत झाल्या आहेत तर दोन मेंढ्या जबर जखमी झाल्या आहेत तरी शासकिय नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी अश्या स्वरूपाचा अर्ज वनक्षेत्रपाल कोंडाईबारी यांना केला आहे. 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती श्री दादाभाई रघुनाथ पगारे व त्यांचा मुलगा गोपाल दादाभाई पगारे यांनी दिली आहे