हाताच्या वादात, कमळाने बाजी मारली! एमआयएम ठरला हुकमी एक्का !
पहा राजकीय विश्लेषण:-
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदासाठी मागील 26 दिवसा पासून फार मोठी उत्सुकता लागली होती. आज दिनांक 10 फरवरीला ती उत्सुकता संपली.
काँग्रेस आणि भाजपात सत्ता संघर्षासाठी जुडवा जुळवी चे समीकरण सुरू होते. दोन्ही पक्षाकडून आमचाच महापौर महानगरपालिकेत बसेल असे दावे केले जात होते.
शेवटच्या दिवसापर्यंत न उघडणारे कोढ भाजपच्या अखेर हातात लागले.
काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेसला चांगलाच जीवारी लागला. बहुमताच्या जवळ असताना चार सदस्याची जुडवा जुळवा काँग्रेसला करता आली नाही. चंद्रपूरच्या जनतेकडून नव संजीवनी मिळाली होती.
जनतेने दिलेले बळ काँग्रेसला पचनी पडले नाही. हाती आलेली सत्ता हट्टासापाही अखेर गेली. आणि अशी म्हणण्याची वेळ आली 'हाताच्या वादात, कमळाने बाजी मारली!
चंद्रपूर महानगरपालिकेच्या सिंहासनावर महापौर म्हणून संगीता खांडेकर विराजमान झाल्या. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रशांत दानव उपमहापौर ईश्वराच्या साक्षीने बनले. महापौरासाठी भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली. तर काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना 31 मते मिळाली. मात्र यांच्या विजयात खरा हुकमी एक्का राहिले ते एमआयएमचे निवडून आलेले नगरसेवक
यांनी आपली तटस्थ भूमिका घेतल्याने भाजपाला विजयश्री प्राप्त करता आले. उपमहापौर पदासाठी पप्पू देशमुख, आणि अपक्ष निवडून आलेले प्रशांत दानव आजच त्यांनी उबाठा या पक्षात प्रवेश केला होता. यांच्यात दोन्ही पक्षाकडून समान 32 मतदान आल्याने त्यांना ईश्वर चिट्टी टाकण्यात आली. त्यात प्रशांत दानव यांनी विजयश्री प्राप्त केले.काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असूनही अंतर्गत गटबाजीमुळे तोंडात आलेला घास हिरवला गेला. काँग्रेसच्या अनेक नाट्यमय घडामोडी नंतर, वेळ निघून गेल्यावर काँग्रेसचे खासदार ,आमदार, आणि जिल्हाध्यक्ष एकाच मंचावर दिसून आले. आणि शेवटी घोरपड गेल्यावर फडकडीच्या मागे पहात राहिले!
एमआयएम सभागृहात उपस्थित राहूनही मतदानापासून तटस्थ राहिले. वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार या निवडणुकीपासून दूर राहिले. तर, उबाठा गटाने,अपक्षाने
भारतीय जनता पार्टीला साथ देत अखेर महापौर पदावर संगीता खांडेकर एक मतांनी विजय झाला.
