कालव्यात पडलेल्या सांबराला जीवदान

 मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन संंस्थेचा पुढाकार 
 मनोज चिचघरे/भंडारा पवनी:


  गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे हि आता नित्याचीब बाब झाली आहे अशाच प्रकारची घटना गुरुवाला सकाळच्या सुमारात संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र,२१६मधून जाणार्या कालव्यात घडली, कालव्यात सांबर पडल्याची माहिती मिळताच मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्था पवनी व वनविभागाच्या बचाव दलाच्या संयुक्त प्रयत्नाने नहरात पडलेल्या सांबराला सुखरुप बाहेर काढण्यात आले,  कालव्यात सांबर पडल्याची मिळताच वन विभागाने नहरात सांबर पडले असल्याची खात्री करून मैत्रच्या पदाधिकार्याना घटनास्थळी बोलवण्यात आले कालव्यात पडलेल्या सांबर हा थकून उपकालव्याच्या प्रवेशद्वाराला बसून असल्यामुळे त्याला पकडण्यात आले.
 सांबराला उचलून पडल्या जागेवरून वरती उचलण्याची कसरत करावी लागली, बचाव कार्यात महादेव शिवरकर, संगरत्न धारगावे, मादव वैध, चंद्रकांत काटेखाये, अमोल वाघमारे, गजानन जुमडे, प्रभारु क्षेत्रसाहेक ए, एस करपते, बिटरक्षक ए, व्ही,खैते, एच, ए, जायपाये ,बी बी, मुंढे, बावनथडे, कुझेँकर, वनमजूर डाहारे, पचारे, अशोक बोरकर, तलमले, यांचा समावेश होता,