उज्वलाने आणले गृहिणीच्या डोळ्यात पाणी

पुन्हा चुल पेटू लागल्या : उज्ज्वला योजनेतून गँस जोडणी मिळूनही महागाईने केली अडचण



गणेश जैन/धुळे
बळसाणे (खबरबात)  :  केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून माळमाथा भागातील अनेक सर्वसामान्य व गरिब कुटुंबांना अल्प किमतीत घरगुती वापराच्या गँस जोडण्या दिल्या सुरुवातीला यासोबत भरलेले सिलेंडर मिळाले मात्र ते संपल्यावर त्यासाठी भरावी लागणारी रक्कम जवळपास *एकहजाराच्या घरात गेल्याने ती रक्कम गरीब परिवाराला जमा करणे परिस्थितीच्या बाहेर गेल्या चे चित्र दिसून येत आहे*
  शासनाने मोफत गँस जोडणी दिल्या नंतर ही वाढत्या महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या बहुतांश कुटुंबीयांनी गँस चा वापर बंद केला आहे *घरात गँस जोडणी असल्याने राँकेल मिळणे बंद झाले आहे यामुळे माळमाथा परिसरात जुने ते सोने असे म्हणत स्वयंपाकासाठी घरातील चुल पेटवायला लागले आहेत* त्यामुळे या योजनेचा हेतू असफल ठरल्याचे महिलावर्गाकडून सांगितले जाते आहे
  एकेकाळी आगाऊ नोंदणी करून वर्षानुवर्षे गँस जोडणीचे वाट पहावी लागत होती मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात झालेल्या सुधारणेमुळे  मोठ्या प्रमाणात याची मुबलकता वाढली मागेल त्याला तत्काळ या जोडण्या मिळू लागल्या शहरीभागाप्रमाणेच ग्रामीण भागात देखील गँस जोडणीचा वापर वाढू लागला *सहज होणारी उपलब्धता व आवक्याबाहेरील किंमत यामुळे मध्यवर्गासह सामान्य कुटुंबातही चुली ऐवजी गँस वर स्वयंपाक शिजू लागला*
   केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी *पंतप्रधान उज्ज्वला  योजना सुरु केली स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकडाचा होणारा वापर कमी होऊन जंगल तोड कमी व्हावी व चुलींवर स्वयंपाक करतांना महिलांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू झाली*
यासाठी २०११ मध्ये झालेल्या अर्थिक व जातनिहाय गणनेतून पुढे आलेल्या यादीतून कुटुंबाची निवड करण्यात आली नोंदणीसाठी नाममात्र रक्कम घेऊन या जोडण्या जवळपास मोफत देण्यात आल्या सुरुवातीला या सोबत सिलेंडर देण्यात आले यात *निवड झालेली बहुतांश कुटुंबे दारिद्रयरेषेच्या खालील , अल्पभूधारक शेतकरी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी आहेत*
  प्रथमतः च घरात गँस शेगडी जोडणी आल्यावर घरात महिनाभर आनंद होत होता *ते पहिले सिलेंडर संपल्यावर नवीन आणून त्याचा वापर केला मात्र अनुदानित सिलेंडर चा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने इतकी मोठी रक्कम एकाच वेळी जमा करणे सर्वसाधारण कुटुंबाला आता अशक्य झाले आहे सध्या सिलेंडर साठी ९५० रुपये अगोदर भरावे लागतात यापैकी काही रक्कम नंतर अनुदान म्हणून बँकेत खात्यावर जमा होते तरीही हातावर खाणाऱ्यांना व मोलमजुरी करणाऱ्यांना एवढी रक्कम जमा करणे आवक्याबाहेर आहे त्यामुळे माळमाथा परिसरातील बहुतांश ठिकाणी गँस चा वापर बंद करून चुलीवर स्वयंपाक शिजवीत आहेत*

 
ग्रामीण भागात सर्व साधारण कुटुंबाला मोफत केंद्र शासनाकडून गँस जोडण्या दिल्या आहेत गँस कधी पेटवता आला नाही गँस पेटवतांना भय लागायचे चुलीवर स्वयंपाक करीत असताना जो घरात धुर व्हायचा ते बंद झाले पण आम्ही मजूरी करतो आणि सिलेंडर संपला की एकाच वेळी एक हजार जमा करणे हे आमच्या परिस्थिती चा बाहेर आहे बँकेत सपसिडी मिळते परंतु दुष्काळाची झळ असल्याने एकावेळी सिलेंडर ला ९५० रुपये देणे परिस्थिती च्या बाहेर आहे पहिले चुलीवर स्वयंपाक करायची राँकेल देखील भरपूर मिळायचे पण गँस जोडण्या बहुतांशाच्या घरी झाल्याने घरातील चुल , लाकडे व राँकेल विसरले होते परंतु आता त्यांना च आमंत्रण द्यावे लागते आहे सकाळचे अंघोळीसाठी गरमपाणी व स्वयंपाक चुलीवर च उरकावे लागते आहे
   सौ.कमाबाई मालाजी सोनवणे ,  उभरांडी ( ग्रुहीणी )