चंद्रपुरात चारचाकी वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू

ललित लांजेवार/

चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंगाली कॅम्प बायपास बल्लारशाह मार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीला चारचाकीची धडक बसताच  एका दहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली.
  अल्फिया फिरोज पठाण वय 10 वर्ष असे या मुलीचे नाव असून आई वडील एक बहीण आणि मृत अल्फिया हे एका नातेवाईकाच्या घरून परत घरी जात
असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाची धडक या दुचाकीला बसली, व त्याचा जागीच मृत्यू झाला.
चारचाकी वाहनाने दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वेग नियंत्रित होऊ शकला नाही व त्या गाडीला धडक बसली. यात पठाण परिवारातील तीन सदस्य हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशन करीत आहे.