वाहतूक शाखेतर्फे नो हॉर्न जागरुकता अभियान

 अरूण कराळे /नागपूर:

नागपूर शहराला अपघात मुक्त करण्यासाठी प्रत्येक शहरवासीयांनी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करून पोलीस विभागाला सहकार्य  करण्याचे आव्हान वाहतूक पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी याप्रसंगी केले. नो हॉर्न जागरुकता अभियान कार्यक्रमांतर्गत वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनात एम आय डी सी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या कमांडर ज्योती कुमार सतिजा यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही विभागाच्या  संयुक्त विद्यमानाने नुकताच संविधान चौकात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाअंतर्गत वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करताना हेल्मेटचा,सीटबेल्ट,झेब्रा क्रॉसिंग,स्टॉप लाईनवर वाहन थांबवू नये,व इतर वाहतुक नियमाचे विस्तृत मार्गदर्शन करीत संपूर्ण नागपूर शहरातील वाहतूक सिग्नलवर ३६००  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यातआले असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना घरपोच चालन मिळणार असल्याने वाहनचालकांनी याबाबत खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या हॉर्न न वाजविण्याची सूचना फलक हातात घेऊन ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आव्हान केले.तसेच अधिकाऱ्यांनी याप्रसंगी मेगाफोन द्वारे मार्गदर्शन केले.