दवलामेटी ग्रामपंचायतनी केला दिव्यांगाचा सन्मान

प्रती व्यक्तींना वीस हजार रुपयांची मदत
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे


दवलामेटी ग्रामपंचायत अतंर्गत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतमधील उत्पन्नाच्या पाच टक्के निधी अंतर्गत दिव्यांग व्यक्तीना कमोट शौचालयाच्या बांधकामाकरीता वीस हजार रुपयाचा धनादेश सरपंच आनंदीताई कपनीचोर व उपसरपंच गजानन रामेकर यांच्या हस्ते ९ दिव्यांग व्यक्तींना देण्यात आले . समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी, संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय, तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्या सुध्दा योजना दवलामेटी ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी विष्णु पोटभरे यांनी प्रास्ताविकतेतून सांगीतले .यावेळी माजी सरपंच संजय कपनीचोर , नितीन अडसड , प्रशांत केवटे , रमेश गोमासे, रागीनी चांदेकर, कमल पेंदाम , रश्मी पाटील , प्रभा थोरात , कल्पना गवई , सुरेंद्र शेंडे , मनोज गणवीर , उमेश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते .