गोंदिया येथे अटल मॅराथन दौड
मनोज चिचघरे/भंडारा, प्रतिनिधी
सी.एम.चषक अंतर्गत स्व.श्री अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या जयंती निमित्य आज दिनांक 25 डिसेंबर 2018 रोजी अटल मॅराथन दौड, मूर्री रोड, गोंदिया येथे आयोजित करण्यात आलेली होती.
 या अटल मॅराथन दौड चे उदघाटन आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हेमंतभाऊ पटले,, मुख्य अतिथी श्री अशोक इंगळे, श्री राधेश्याम अग्रवाल, श्री रमेशभाऊ कुथे, श्री विरेन्द्र अंजनकर, श्री विनोद अग्रवाल, श्री पंकज रहांगडाले, श्री भाऊराव उके, श्री सुनील केलनका, श्री शिव शर्मा, श्री घनश्याम पानतवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या अटल मॅराथन दौड मध्ये हजारोच्या संख्येनी युवकांनी भाग घेतलेला होता. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते विजेतांना पारीतोषिक वितरण करण्यात आले.