वाढदिवसा प्रित्यर्थ फळ वाटप कार्यक्रम


चिमूर/रोहित रामटेकेदिनांक.२५/१२/२०१८ ला युवा मंच संघटनेचे तालुका अध्यक्ष संदिप कावरे यांच्या २९ सा व्या वाढदिवसा प्रित्यर्थ फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला आपण सगळीकळे नेहमी बघत असतो कि सर्व जण केक कापून स्वतःचं वाढदिवस साजरा करीत असतात तर काही पार्टी करून वाढदिवस साजरा करीत असतात व या कुठल्याही प्रकाराला न जुमानता मूकबधिर विदयार्थी तसेच रुग्णांचे आशिर्वाद लाभो व माझ्या हातून सदैव अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्याची प्रक्रिया सुरु राहावी अशी इच्छा यावेळी व्यक्त केली. व या कार्यक्रमानिमित्ताने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथिल भरती असलेल्या रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी उप जिल्हा रुग्णालय येथिल डॉ.किन्नाके तसेच युवा मंच संघटना तालुका अध्यक्ष संदिप कावरे यांच्या सोबत युवा मंच चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.व सरकार मान्य अनुदानित शाळा राष्ट्र संत तुकडोजी मूक बधिर विधालय वडाळा (पैकु)चिमूर येथिल विदयार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाची संपूर्ण चिमूर शहरात चर्चा रंगली आहे.