उषाताईचा जन्मदिन शिक्षकासाठी आदर्श


सागर भटपल्लीवार/राजुरा
बाळू' Be A Part Of Loving Unit* संकल्पनेतून उषाताई बोबडे यांनी  वाढदिवशी कुपोषित बालकाला  दत्तक घेऊन पोषण आहार ची भेट दिली. 
अमित महाजनवार यांच्या कुपोषण मुक्तीचे  कार्य  सर्वांसाठी प्रेरणादायी.  समाजासाठी काहीतरी चांगले घडावे या दृष्टीकोनातुन आपल्या जीवनातील आनंदाचे दिवस ते समाजासोबत साजरे करत असतात. अशाच व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे सौ. उषाताई बोबडे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित् इंदिरानगर राजुरा येथील कुपोषित बालकाला दत्तक घेत पोषण आहाराची भेट देण्यात आली.
 सदर उपक्रम राजुरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांच्या संकल्पनेतून 'बाळु'  be a part of loving unit अंतर्गत वाढदिवासाच्या दिवशी  कुपोषित बालकास दत्तक घेऊन ,  बालकास पाच प्रकारच्या उसळीचे प्रकार ,शेंगदाना व गुळ 1 किलो असा जिन्नस त्या कुपोषित बालकांच्या पालकांना सुपुर्द करण्यात आला.तसेच त्या बालकाच्या घरा शेजारच्या अंडी विक्रेत्याला 520 रुपये सुपूर्द करून आठवड्यात दोन अंडी अशे वर्षभर 104 अंडी देण्याचा सूचना केल्या.
         सदर पोषण आहार पुरवठा करून त्या बालकांचे पालकत्व स्वीकारने असा उपक्रम आहे या कुपोषण मुक्ती च्या चळवळीची संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चर्चा होऊन सर्वत्र प्रदिसाद मिळत आहे.
        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्तानी पंचायत समिती राजुरा चे विस्तार अधिकारी  श्री.अमित महाजनवार होते .प्रमुख पाहुणे मनोहर बोबडे, भास्कर वाटेकर, वंदना वाटेकर जगदीश पिंगे,  बाळू चे अनिल पुरटकर, सागर भटपल्लीवर, पत्रकार शर्माजी तसेच अंगणवाडी सेविका पठाण उपस्थित होत्या.
               *'बाळु'  be a part of loving unit* संस्थेअंर्तगत सौ. उषा बोबडे यांनी स्वतःच्या   वाढदिवशी  हा उपक्रम राबवून एक सामाजिक बांधीलकि जपली या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.श्री. बोबडे यांनी मनोगत वक्त करतांना हा उपक्रम सर्व राजुरा  तालुक्यात राबवून तालुका  कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे ते अभिनंदनीय आहे तसेच बाळु च्या कार्यामुळे जनमानसात कुपोषण यावर चर्चा सुरू होवून जण जागृती होत असल्याचे प्रतिपादन केले व यापुढे या कार्यात भरीव सहभागाची इच्छा वक्त केली.
या प्रसंगी अमित महाजनवार यांनी  सर्वांनी अश्याच प्रकारे वाढदिवस साजरा करून राजुरा तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाचे संचालन जगदीश पिंगे यांनी  तर प्रस्ताविक बोबडे  यांनी केले.