जवाहरलाल नेहरु विद्यालयात इंग्रजी कार्यशाळेचे आयोजन


वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
येथील जवाहरलाल नेहरु विद्यालयात वर्ग १० वी मधील इंग्रजी विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेचे आयोजन व्हिएसपीएम अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन व नवनित फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले . अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह व जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पालक संचालक युवराज चालखोर होते तर प्रमुख पाहूणे म्हणून सर्टचे माजी संचालक वसंत कुबडे, जनार्धन वाघमारे ,नवनीत फाऊंडेशनचे सुनील पोतदार प्रामुख्याने उपस्थित होते . तज्ञ मार्गदर्शक संजय सालपेकर , चित्रा मुजुमदार व राजेश जाधव यांनी नवीन अभ्यासक्रमाबद्दल माहीती दिली . कार्यशाळेचे आयोजन शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक खोडे व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अशोक काळबांडे यांनी केले .
प्रशिक्षणास व्हीएसपीएम अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन संस्थेतंर्गत असलेल्या शाळेचे शिक्षक तसेच वाडी, बाजारगाव, व हिंगणा केंद्रातील शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अमित गायधने यांनी केले .