चंद्रपुरात अस्वलीचा तांडव;आणखी एकावर हल्ला

चंद्रपूर/अमोल जगताप :                                           
                                                         
    हरवलेला बैल शोधण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीवर अस्वलीने पुन्हा एकदा हल्ला चढवीत गंभीर जखमी केले.आनंदराव इंदरशाई कुमरे वय ४५  मु.आंबेधानोरा जि.चंद्रपुर असे या जखमी इसमाचे नाव आहे.
आनंदराव कुमरे हे आपला हरवलेला बैल शोधण्यासाठी डोंगर हळदीच्या कंपार्टमेंट नं 516 मध्ये गेले होते. तितक्यात अस्वलीने त्यांचेवर हल्ला चढवला ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात येताच ते लागलीच मदतीला धावले. आणि भाऊरावांची हल्ल्याततुन सुटका केली.जखमीला गावकऱ्यांनी लगेचच रुग्ण वाहिकेने शासकीय रुग्णालयात चंद्रपूर येथे पाठवून करून जखमीवर त्वरीत उपचार सुरू केले आहेत.

मंगळवारी देखील सरपण गोळा करायला गेलेल्या गावकऱ्यावर जंगलात असलेल्या अस्वलीने हल्ला चढविला,या हल्ल्यात भाऊराव लक्ष्मण सामुसागडे मु.नवरगाव ता.सिंदेवाही जि.चंद्रपुर ह्या इसम गंभीररीत्या जखमी झाला.दिवसेंदिवस मानव व वन्यजीव संघर्ष वाढत जात आहे.पुढील कार्यवाही वनविभागाचे अधिकारी करीत आहे.