दिलेला शब्द पूर्ण करणार -

आ. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया 



चिमूर/रोहित रामटेके
 चिमूर:-आम्रवन दीक्षाभूमी सुगतकुटी भिक्षुसंघ संस्था मालेवाडा यांच्या वतीने दोन दिवसीय भव्य धम्म परिषद व भिक्षुची धम्मदेशना हा कार्यक्रम १६ व १७ डिसेम्बर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
       दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आम्रवन दीक्षाभूमी सुगतकुटी भिक्षुसंघ संस्था मालेवाडाच्या वतीने भव्य धम्म परिषद व भिक्षुची धम्मदेशना च्या  कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया आपला वेळातून वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहतात. मागील वर्षी मा.आमदार साहेबांनी समस्त बौद्ध बांधवाना, आम्रवन दीक्षाभूमी सुगतकुटी भिक्षुसंघ संस्था मालेवाडाच्या सर्व जागेचे सौंदर्यीकरण व डाँ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तसेच या संस्थेच्या संपूर्ण गरज पूर्ण करणार याचे वचन दिले होते. त्या वचनाच्या आधारावर मा.आ.बंटीभाऊ भांगडिया याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे, व त्याच्या बद्दल कमीत कमी वेळामध्ये त्याचे प्रयत्न पूर्ण होत आहे असे मा.आमदार साहेबानी बौद्ध बांधवासोबत बोलताना सांगितले आहे.        त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मा.डाँ. दिलीप शिवरकर,  वसंत वारजूकर,,सुराजदादा नरुले आदी.उपस्थित होते.