एसटी बस मधून ८३ हजाराची दागिन्यांची चोरीउमेश तिवारी/ कारंजा (घाडगे) वर्धा
नागपूर कडून आर्वी कडे जाणाऱ्या भंडारा आर्वी एसटी बस क्र. MH40Y5559 या बसमधून ८३ हजार रुपयांचे दागिने बसमधून चोरी गेल्याची घटना काल २२ डिसेंबर सायंकाळी ५.३० ला टोल नाक्यावर बस थांबली असतांना घडल्याचे लक्षात आले. ही बस टोलनाक्यावरून कारंजा बसस्थानकावर परत आणल्यानंतर बसस्थानक प्रमुख नंदू मडावी यांनी तुरंत पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली. आर्वीला जाण्यासाठी वैशाली जीवन चौधरी वय २५ वर्ष या महिला बसमध्ये प्रवास करत असतांना. अज्ञात चोरट्यांने संधी साधली.

तक्रारीनुसार-१सोन्याचे नेकलेस (१०ग्राम), १सोन्याची पोत (३०ग्राम), १सोन्याची नथ(१ग्राम), लहान मुलीच्या तोरड्या (१०ग्राम) एकूण ८३ हजाराचे ऐवज चोरीला गेले. सध्या बसमधून दागिने चोरी जाण्याचा प्रकार वाढत आहे. त्यामध्ये महिलांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.