परसोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

 चंद्रपुर/प्रतिनिधी:

 गोंडपिपरी तालुक्यातील येत असलेल्या परसोडी येथील अरिहंत बुद्ध विहार परसोडीच्या वतिने भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला आदरांजली वाहण्यात आली.
     सर्वप्रथम पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण बौद्ध समाज परसोडी चे अध्यक्ष विलास रायपुरे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बौद्ध उपासक व उपासिका यांचा विशेष सहभाग होता. उपस्थित लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सोनू चांदेकर ' वसंत चांदेकर ' रमेश गव्हारे ' बंडु मेश्राम ' धनपाल ताडे ' दत्तुजी रामटेक्के ' संजय नारनवरे' प्रशिक माऊलिकर' सिद्धार्थ मेश्राम' अरुण माऊलिकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्रिशरण-पंचशिल ग्रहण करुन सायंकाळी भीम ज्योत मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणुक अरिहंत बुद्ध विहारापासुण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा परसोडी इथपर्यंत काढण्यात आली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे' अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी महिला वर्गानी गीत गायनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ह्यात सलोनी नारनवरे ' जयश्री रायपुरे ' दीक्षा गव्हारे ' मीनाक्शी अलोने ' चंद्रकला चांदेकर ' वैजंती ताडे ' पुश्पा मेश्राम यांची सहभाग होता. अतिशय शांततेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त आदरांजली कार्यक्रम पार पाडला.