गाळे बांधकाम लोकार्पण सोहळा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ., चंद्रपूर 20% मूलभूत सुविधे अंतर्गत



प्रशांत गेडाम/सिदेंवाही -
 तालुक्यातील ४कि.मी असलेला लाडबोरी या गावात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर 20% मूलभूत सुविधा अंतर्गत गाळे बांधकाम लोकार्पण सोहळा दिनांक ११-१२- २०१८ मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.श्री . नागराज  गेडाम जिल्हा परिषद सदस्य चंद्रपुर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा . श्री. मधुकर जी मडावी सभापती पंचायत समिती सिंदेवाही प्रमुख पाहुणे होते मा. श्री. रितेश अलमस्त पंचायत समिती सदस्य सिंदेवाही , मा. श्री . अशोकजी ईल्लुकर साहेब सवर्ग विकास अधिकारी  सिदेंवाही , यांच्या हस्ते व मार्गदर्शनाने कार्यक्रम साजरा झाला.तसेच लाडबोरी गावा मधील ग्रामपंचायत चे  ,सरपंच  सौ. रजनीताई राजू नन्नावरे  हे होते तसेच  श्री.निखिल डांगे  सचिव  (ग्रामसेवक) हे होते. सदस्य प्रकाश नंन्नेवार, श्री.प्रदीप कारमीेंगे ,दिवाकर चहांदे,सौ. प्रज्ञा नागदेवते , सौ. सुगंधा नगराळे, सौ. साधना नन्नेवार , सौ. मंदा नागदेवते , व लाडबोरी ग्रामपंचायत  चे कर्मचारी संजय नागदेवते , छत्रपाल डांगे या गावातील जेष्ठ नागरिक तसेच गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.