पाणी टंचाई दूर करा; नांदुरा नगर पालिकेवर मोर्चा धडकला !


नांदुरा: प्रतिनिधी
शहरातील भिमनगर, रामनगर परीसरातील पिण्याचे पाण्याची टंचाई दुर करणे व विकास कामांचे मागणीसाठी  मंगळवार दि.१८ डिसेंबर रोजी  भारीप बहुजन महासंघ युवा आघाडिचे वतीने नांदुरा नगर पालिका कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.
    नियोजीत आयोजनानुसार दुपारी १२ वाजता भिमनगर,रामनगर परीसरातुन प्रारंभ करण्यात आलेला होता. सदर मोर्चा नांदुरा शहराचे प्रमुख मार्गावरून जातांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते.सदर मोर्चात पाणी टंचाई व परीसरातील ईतर नागरी समस्यांनी त्रस्त झालेले सर्वधर्मिय नागरीक व महिला स्वयंम स्फुर्तीने मोठ्या संख्येत सहभागी झालेले दिसुन आले.
     सदर मोर्चा नांदुरा नगरपालीका कार्यालयावर पोहोचला असता तेथे सुरक्षेचे दृष्ट्रिने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मोर्चातील बहुसंख्य मोर्चेकर्‍यांचे गर्दीमुळे राष्ट्रिय महामार्गावरील वाहतुक विस्कळित होऊ नये म्हणुन सर्व मोर्चेकर्‍यांना नगर पालिकेच्या आवारात प्रवेश देण्यात आला होता.
     नांदुरा नगर पालिकेच्या आवारात मोर्चेकर्‍यांनी प्रवेश करताच ,,पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे !,,या घोषणांची न.प.आवार दणाणुन गेलेले दिसत होते. अशातच संतप्त झालेल्या महिलांनी आपल्या सोबत आणलेल्या मातीच्या घागरी व माठ फोडुन नांदुरा नगर पालिका प्रशासनाचा निषेध केला.
   रामनगर व भिमनगर परीसरातील प्रमुख नागरीक व महिलांचे शिष्ठमंडळाने पोलीस बंदोबस्तात मुख्याधिकारी डोके साहेब यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. चर्चा केली असता मुख्याधिकार्‍यांनी पाण्याची व ईतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मोर्चातील नागरीकांच्या मागण्या ऐकुन त्या कशा सोडविता येतील याबाबत न.प. पदाधिकारी व नगरसेवक गैरहजर होते हे विषेश !
   धडक मोर्चा यशस्वी करण्यासाठी धम्मपाल वाकोडे,वैभव मनवुर,राजाभाऊ वाकोडे,गणेश वानखडे,राजरत्न तायडे, शैलेश वाकोडे, अर्जुन वानखडे,अरूण वाकोडे, अनिसभाई ठेकेदार, रशीदभाई, शालुबाई वाकोडे, बासोडे ताई, छायाबाई आमले यांचेसह अनेक मान्यवरानी परीश्रम घेतले होते.